Sharad Pawar, Chhagan Bhujbal sarkarnama
नाशिक

Chhagan Bhujbal News : भुजबळ म्हणतात, 'शरद पवार यांनी कांद्याला हमीभाव का दिला नाही'

Sharad Pawar छगन भुजबळ यांनी कांदा प्रश्नावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.

Sampat Devgire

Bhujbal Vs Sharad Pawar News : राज्यात कांदा निर्यातबंदीचा प्रश्न पेटला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनावर शेतकरी नाराज आहेत. या संदर्भात विविध आंदोलने होत आहेत. अशातच छगन भुजबळ भारतीय जनता पक्षाच्या मदतीला धाऊन आले आहेत.

काल चांदवड येथे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत भारत जोडो न्याय यात्रेच्या शेतकरी सभा झाली. या वेळी कांदा निर्यातबंदीच्या प्रश्नावर शेतकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत सत्ताधारी पक्षाला लक्ष्य केले होते. या वेळी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत हेदेखील उपस्थित होते.

चांदवड येथील सभेत शरद पवार यांनी भारतीय जनता पक्ष शेतकरीविरोधी आहे. त्यांनी कांदा प्रश्नावर सातत्याने शेतकरीविरोधी भूमिका घेतली होती, असे विधान केले होते. त्याचा समाचार भुजबळ यांनी घेतला आहे. छगन भुजबळ म्हणाले, शरद पवार केंद्रात कृषिमंत्री होते. ते कृषिमंत्री असताना त्यांनी कांद्याला हमीभाव का दिला नाही?. तेव्हादेखील कांद्याचे भाव पडले होते. त्यामुळे त्यांनी कांद्याला हमीभाव देण्यासाठी प्रयत्न का केले नाहीत, असा प्रश्न केला.

ते म्हणाले, कांद्याचे दर कोसळले आहेत. ते पूर्ववत होण्यासाठी आमचे नेते प्रयत्न करीत आहेत. मात्र, शरद पवार यांनी कांद्याला हमीभाव द्यायचा होता, तो का नाही दिला. त्यांनी तसा निर्णय घेतला असता, तर आज हा प्रश्नच उपस्थित झाला नसता, असा दावाही भुजबळ यांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नाशिक जिल्ह्यात कांदा निर्यातबंदी आणि कांद्यावर लावण्यात आलेले निर्यात शुल्क यामुळे कांद्याचे भाव कोसळले आहेत. त्यात शेतकऱ्यांना हजारो कोटींचा फटका बसला आहे. मोठे आर्थिक नुकसान झाल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. अडचणीत असलेल्या या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधी पक्षांकडून सातत्याने आवाज उठविला जात आहे. त्याबाबत भाजप बचावाच्या भूमिकेत आहेत, अशा स्थितीत भुजबळ मात्र भाजपच्या मदतीला धावून आले आहेत.

Edited By : Umesh Bambare

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT