Chandwad Muslim Society Sarkarnama
नाशिक

Maratha Reservation : मराठा आरक्षणास पाठिंब्यासाठी चांदवडला मुस्लीम समाजही उतरला रस्त्यावर

संपत देवगिरे- सरकारनामा ब्युरो

Chandwad Muslim Society : राज्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावे यामागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आरमण उपोषण सुरु केले आहे. राज्यभरातही अनेख ठिकाणी मराठा समाजाच्याबांधवांचे उपोषण सुरू आहे. तर आता आरक्षणाच्या या मागणीला पाठींबा दर्शविण्यासाठी चांदवडच्या मुस्लीम बांधवांनी रॅली काढून शासकीय विश्रामगृहासमोर उपोषणाला बसलेल्या मराठा बांधवांना पाठींबा असलेले निवेदन दिले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मराठा समाजाबरोबर मुस्लीम समाज ही मराठा समाजाला आरक्षण मिळावे यामागणीसाठी खांद्याला खांदा लावून आंदोलनात सहभागी होईल, असेही मुस्लीम बांधवांनी सांगितले. चांदवड येथील सकल मराठा समाज बांधव हे साखळी उपोषण करत आहे.

समाजाला शासनाने आरक्षण द्यावे ही मागणी रास्त असून शासनाने आरक्षाबाबत तातडीने कार्यवाही करावी, मराठा समाजाला न्याय द्यावा यासाठी चांदवड शहर व तालुका मुस्लीम समाजाचे वतीने पाठींबा दिलेला आहे तरी शासनाने मराठा समाजाला आरक्षण देण्या बाबतची कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी अल्ताफ तांबोळी, मुखतार मलीक, जावीद शेख,शफाक कुरेशी, तौफिक शेख, समीर शहा, सत्तार शेख,जुबेर शहा, अरबाज शेख, परवेझ पठाण, रिजवान घासी,जाहीद घासी, गुल्लुभाई घासी, जाकीर शहा, मुन्नुभाई घासी आदींसह बहुसंख्य मुस्लिम बांधव उपस्थित होते.

तर, उपोषणाला बसलेल्या सकल मराठा समाजातील बांधवांना मुस्लीम बांधव निवेदन देताना माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, डॉ आत्माराम कुंभार्डे, संजय जाधव, समाधान जामदार, प्रकाश शेळके, अल्ताफ तांबोळी, मुन्नुभाई घासी आदींची उपस्थिती होती.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT