Nashik News: महिलांना फसवून लैंगिक अत्याचार करणाऱ्या नाशिकमधील भोंदू अशोक खरात याचे प्रकरण ताजे असतानाच आणखी एक सेक्स कँडल नाशिकमध्ये उघडीस येत आहे. मैत्रिणीचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत एका व्यावसायिकाकडून 12 लाखांची खंडणी मागण्यात आली होती.
याप्रकरणी चार संशयितांना सातपूर पोलिसांना ताब्यात घेतले आहे. तक्रारदार व्यावसायिकाची पण चौकशी होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. हे चारही जण व्यावसायिकाला ब्लॅकमेल करीत होते. मैत्रिणीसोबतचे अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याला ब्लॅकमेल करण्यात येत होते.
ब्लॅकमेलींगचा दहा हजार रुपयांचा पहिला हफ्ता घेताना पोलिसांनी चार जणांना सापळा रचून पकडले. आरोपींकडून जप्त केलेल्या टॅबमध्ये तब्बल दीडशे ते दोनशे आक्षेपार्ह खासगी व्हिडीओ पोलिसाना आढळले आहेत. या प्रकरणी सातपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. चार जणांची चौकशी सुरु आहे. आकाश बकरे, प्रकाश पानपाटील, सूरज गवई, श्रीपत शिंदे अशी चौघांची नावे आहेत.
अशोक खरात अनेक महिलांचं लैंगिक शोषण केलं आहे. त्यांचे १०० हून अधिक अश्लील व्हिडीओ पोलिस तपासात समोर आले आहेत. या प्रकरणी पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे. हा घडनेने महाराष्ट्र हादरला असतानाच नाशिकमधून आणखी एक मोठं कांड उघडकीस आलं आहे.
आरोपींनी नाशिकमधील एका बड्या व्यावसायिकाच्या कार्यालयातून टॅब चोरी केला होता.
२ एप्रिल रोजी सकाळी १२ वाजता मोबाइलवर व्यावसायिकाला फोन आला.
७ वाजेपर्यंत ५० हजार रुपये द्या व तुमचा टॅब घेऊन जा', असे संशयित बोलला.
व्यावसायिकाने कार्यालयात जाऊन खात्री केली असता टॅब चोरल्याचे लक्षात आलं.
चोरट्याकडून टॅबमधील जुन्या मैत्रिणीसोबत असलेले काही खासगी फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन १२ लाखांच्या खंडणीची मागणी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.