Chhagan Bhubal, Nitin Bhosle Sarkarnama
नाशिक

NCP Political War : नितीन भोसले भुजबळांना पुरून उरणार?

सरकारनामा ब्यूरो

अरविंद जाधव :

Nashik News : नाशिक जिल्ह्याच्या (Nashik) राजकारणात एक महत्त्वाची घडामोड घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर अजित पवार गटात गेलेल्या छगन भुजबळांना (Chhagan Bhujbal) टफ फाईट देण्यासाठी शरद पवार गटाने एक मोठा मोहरा पुढे सरकवला आहे. त्यामुळे हा नवा मोहरा भुजबळांना पुरून उरणार का, अशी चर्चा सध्या जिल्ह्यात सुरू झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर छगन भुजबळांनी अजित पवारांना साथ दिली. सध्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघावर शरद पवार (Sharad Pawar) यांची मजबूत पकड आहे तर, नाशिक लोकसभा मतदारसंघात भुजबळ यांया पाया भक्कम आहे. भुजबळांची ही उणीव दूर करण्यासाठी माजी आमदार नितीन भोसले (Nitin Bhosle) यांची प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भोसले यांनी 2009 मध्ये मनसेचे आमदार होते. काही महिन्यांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (शरद पवार गट) प्रवेश केला.

नितीन भोसले यांच्या प्रवेशाने राष्ट्रवादीने नाशिक मध्य आणि नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघांच्या राजकीय गणिताचे आडाखे डोळ्यासमोर ठेवले आहेत. याबाबत 'सरकारनामा'शी बोलताना प्रदेश सरचिटणीस नितीन भोसले यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. 'पक्षाने दिलेली जबाबदारी पूर्ण करण्याचे काम प्रत्यक्ष सुरू झाले आहे. आमचे लक्ष्य युवक आहेत. खोटे व्हिडीओ, रिल्सच्या माध्यमातून युवकांची माथी भडकवली जात आहेत. शरद पवारांनी राज्यात आयटी हब सुरू केले आहेत. औद्योगिकीकरण आणि शेती क्षेत्रातील बॅलन्स बिघडू न देता विकास कसा साधला जातो, हे दाखवून दिले. युवकांपर्यंत हेच काम आम्ही पोहचवू', असे भोसले यांनी स्पष्ट केले. शहरातील विधानसभा मतदारसंघासह येवल्याकडेही विशेष लक्ष देणार असल्याचे भोसले यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

3 आमदार, 3 मंत्री अन् 2 खासदारांनी काय केले?

नाशिक शहरात भाजपाचे तीन आमदार आहेत. छगन भुजबळ आणि दादा भुसे (Dada Bhuse) हे मंत्री आहेत. भारती पवार या केंद्रात राज्यमंत्री आहेत. हेमंत गोडसे (Hemant Godse) खासदार आहेत. एवढे पाठबळ असताना भाजपासह त्यांच्या सहकारी पक्षांनी नक्की काय प्रकल्प शहरात अथवा जिल्ह्यात आणले, हे दाखवून द्यावे, असे आव्हान भोसले यांनी दिले आहे. मतदारसंघात करून दाखवले, असे सांगण्यासारखे काहीही नसल्याने सत्ताधारी जातीधर्मात तेढ निर्माण करत असल्याचा आरोप भोसले यांनी केला.

विकास नसल्यानेच श्रीरामांचा मुद्दा केंद्रस्थानी

धार्मिक आस्था वैयक्तिक असते. मात्र, सध्या समाजात वेगळेच चित्र निर्माण केले जाते आहे. वास्तविक दहा वर्षांत भाजपाने केंद्रात आणि राज्यात विकासाचे धोरणच राबवले नाही. परिणामी निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी श्रीराम मंदिराचा (Ayodhya Ram Mandir) मुद्दा समोर आणला. सुज्ञ मतदारांसह युवकांपर्यंत आम्ही पक्षाचे हेच धोरण घेऊ जाऊ, असे भोसले यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT