Nashik dist bank : नाशिक जिल्हा बँकेसाठी अजित पवारांनी काय केले?

Swabhimani asked Ajit Pawar : बँक 'एनपीए'तून बाहेर कशी काढणार हे आधी सांगा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा सवाल
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

अरविंद जाधव :

Nashik News : जिल्हा बँकेची भूमिका खूप महत्त्वाची आणि मोठी असते. खास करून शेतकऱ्यांसाठी जिल्हा बँक म्हणजे सबकुछ असते. म्हणूनच नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अजित पवारांना (Ajit Pawar) महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला आहे. आता शेतकऱ्यांच्या या प्रश्नाला उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार कृतीतून उत्तर देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. (Nashik Dist. Central co-op. Bank) वाचवण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिक येथे सांगितले. मात्र, एक रकमी तडजोडवर (ओटीएस) अजित पवार काहीच बोलले नाही. हाच धागा पकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अजित पवारांवर टीका केली. उत्तम प्रशासक अशी ख्याती असलेले अजित पवार जिल्हा बँकेबाबत बॅकफूटवर का? बँक एनपीएतून बाहेर पडत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांचे काहीच भले होणार नाही हे अजित पवारांनाही ठावूक आहे, असा टोला संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी लगावला आहे.

Ajit Pawar
Ajit Pawar : वयाच्या ८५ व्या वर्षी आशीर्वादच द्यावेत, अजितदादांच्या निशाण्यावर पुन्हा पवार ?

एका कार्यक्रमासाठी नाशिकमध्ये आलेल्या अजित पवारांनी नाशिक जिल्हा बँकेच्या प्रश्नावर मत मांडले होते. गैरकारभारामुळे बँक अडचणीत आली. तरीही या बँकेचे लायसन्स रद्द होऊ नये, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. तसेच कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये, या दृष्टीने लवकरात लवकर बँकेचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही शर्थीचे प्रयत्न करत आहोत, असे अजित पवार म्हणाले होते. मात्र, हे सर्व प्रश्न सुटल्यानंतर गैरकारभार करणाऱ्यांना बँकेत प्रवेश देऊ नका, असे आवाहनही अजित पवारांनी केले होते.

दरम्यान, बँक एनपीएतून बाहेर कशी येणार याबाबत अजित पवार काहीच का बोलत नाही, असा सवाल संदीप जगताप यांनी केला आहे. एनपीए असलेल्या बँकेत ओटीएस होत नाही. त्यामुळे कर्जदारांकडून मुद्दल, व्याज, आणि व्याजावरील व्याज वसूल केले जाते. अजित पवारांनी अनेक संस्था उत्तम चालवल्या. अडचणीतून बाहेर काढल्यात. म्हणूनच नाशिक जिल्हा बँकेबाबत अजित पवार बँकफूटवर का जातात, असा प्रश्न संदीप जगताप यांनी उपस्थित केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या सरकारला शेतकऱ्यांकडून अशीच जुलमी वसुली करायची असावी, असे वाटते. नाहीतर अजित पवारच नाही तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री दादा भुसे यांनी अध्यक्ष राजू शेट्टी यांच्याकडून आलेल्या ओटीएसच्या प्रस्तावावर केव्हाच काम केले असते. अंदाजे 35 हजार शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांचे लक्ष या प्रकरणाकडे असताना सरकार वेळकाढूपणा करत असल्याबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेने प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

'सरकारनामा'चा पाठपुरावा

जिल्हा बँकेचा कर्ज वाटप आणि वसुलीचा घोळ अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्यातच अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे हजारो कोटींचे नुकसान झाले आहे. यंदाही शेतकरी दुष्काळाला सामोरे जात आहेत. बँकेच्या तगाद्यामुळे सिन्नर तालुक्यातील एका शेतकऱ्याने काही महिन्यांपूर्वी आत्महत्या केली होती. या घडामोडींचा 'सरकारनामा' सातत्याने पाठपुरावा करत आहेत. 'अबब, पाच हजार शेतकरी होणार भूमीहीन' हे सविस्तर वृत्तही या पाठपुराव्याची ग्वाही देते. या वृत्ताची दखल अजित पवारांनी घेतली. पण, प्रश्न सुटलेला नाही. तो सुटेपर्यंत 'सरकारनामा' पाठपुरावा करतच राहणार.

(Edited by Avinash Chandane)

Ajit Pawar
Ajit Pawar News : अजित पवार यांना हवा असलेला रजनीकांत कोण?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com