Shantigiri Maharaj  sarkarnama
नाशिक

Shantigiri Maharaj news : शांतिगिरींचा अनुयायांना मेसेज... पण, त्या पात्रतेचे उमेदवार सापडतील का?

Nashik Loksabha शांतिगिरी महाराज यांनी आज सहा लोकसभा मतदारसंघात उमेदवारांना पाठिंबा देण्याबाबत भूमिका मांडली

Sampat Devgire

Nashik Political News : शांतिगिरी महाराज यांनी सहा लोकसभा मतदारसंघात आपला प्रभाव असल्याचे सांगितले आहे. या मतदारसंघांसाठी ते आपला पाठिंबा जाहीर करणार होते. त्यासाठी आज त्यांनी आपली भूमिका मांडली. शांतिगिरी महाराज नाशिक मतदारसंघातून अपक्ष उमेदवार आहेत. त्यांनी भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि मनसे या तिन्ही पक्षांकडे उमेदवारी मागितली होती.

शेवटच्या क्षणी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज शिवसेना शिंदे गटाच्या वतीने दाखल केला होता. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडूनही त्यांची निराशा झाली. मुख्यमंत्र्यांनी शांतिगिरी यांना राजकारणात न पडण्याचा सल्ला दिला होता. आपण अध्यात्मिक क्षेत्रातच काम करावे असे त्यांनी सांगितले. त्यामुळे शांतिगिरी महाराजांचे अनुयायी नाराज झाले होते.

शांतिगिरी महाराज यांनी भारतीय जनता पक्षाकडे उमेदवारी मागताना सहा लोकसभा मतदारसंघांमध्ये आपले अनुयायी आहेत. शांतिगिरी महाराज यांना उमेदवारी दिल्यास त्या मतदारसंघात पक्षाच्या उमेदवाराला फायदा होईल. आपले अनुयायी सहा मतदार हजारोंच्या संख्येने असल्याने त्या मतदारसंघांमध्ये शांतिगिरी यांच्या उमेदवारीचा फायदा झाला असता, अशी त्यांची भूमिका होती.

दरम्यान या संदर्भात आज शांतिगिरी महाराज यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली. राजकारणात निस्वार्थ भाव त्याग आणि वैराग्य असलेले कार्यकर्ते असावेत अशा विचारांतूनच देशाची जडणघडण होईल. देशाचा विकास होईल ही भूमिका घेऊन आपण उमेदवारी करीत आहोत. गेल्या अनेक वर्षापासून राजकारणाचे शुद्धीकरण ही मोहीम राबविली आहे असे त्यांनी सांगितले.

महाराजांनी आपल्या अनुयायांना दिलेल्या संदेशात म्हटले की, छत्रपती संभाजीनगर, धुळे, दिंडोरी, जळगाव, जालना आणि शिर्डी या सहा मतदारसंघांमध्ये बाबाजी भक्त परिवाराच्या सदस्यांनी देव, देश आणि धर्म हिताच्या कार्याचा विचार करावा. निस्वार्थी आणि देशभक्त उमेदवारांना निवडून आणण्याचे ध्येय ठेवावे. त्यासाठी सतसद विवेक बुद्धीने मतदान करावे. शंभर टक्के मतदान करावे.

(राजकारणातील महत्वाच्या बातम्यांच्या अपडेटस॒साठी सरकारनामाचे अधिकृत WhatsAppचॅनेल फॉलो करा)

चारित्र्य, त्याग, वैराग्य सेवा आणि समर्पण या भावना असलेल्या उमेदवारांनाच मतदान करावे असा संदेश शांतिगिरी महाराजांनी दिला आहे. शांतिगिरी महाराज सहा मतदारसंघातील उमेदवारांना पाठिंबा देणार असे त्यांनी जाहीर केले होते. त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेत ते कोणत्या पक्षाला पाठिंबा देतील याची उत्सुकता होती. विशेषता त्यांचा पाठिंबा हिंदुत्ववादी उमेदवारांना असेल अशी अपेक्षा होती. मात्र त्याबाबत अपेक्षा भंग झाला आहे. शांतिगिरी महाराज यांनी सांगितलेले निकष असलेले उमेदवार शोधायचे कोणी? आणि ते सापडणार कुठे? प्रश्न मतदार करू शकतात.

Edited By : Umesh Bambare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT