Chhagan Bhujbal News: नाशिक मतदार संघात शांतिगिरी महाराज अपक्ष उमेदवारी करीत आहेत त्यांचा अध्यात्मिक क्षेत्रातील प्रभावामुळे त्यांचा उत्तर महाराष्ट्रात मतदारांवर प्रभाव आहे. त्यामुळे विविध उमेदवारांनी शांतिगिरी महाराज यांची भेट घेतली होती.
लोकसभा निवडणुकीचा प्रचार सध्या जोरात सुरू आहे. प्रत्येक उमेदवाराच्या गाठीभेटी होत आहेत. या पार्श्वभूमीवर आज अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांनी महायुतीचे नेते छगन भुजबळ यांची भेट घेतली.
शांतिगिरी महाराज आणि भुजबळ यांच्या भेटीबाबत मिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत. या भेटीत सुमारे तासभर शांतिगिरी यांनी छगन भुजबळ यांच्याशी बंद दाराआड चर्चा केली. या चर्चेत प्रामुख्याने निवडणूक हा विषय होता. श्री. भुजबळ हे ओबीसी नेते आहेत. नाशिक मतदारसंघातील ओबीसी घटकांचा पाठिंबा मिळविण्यासाठी शांतिगिरी महाराज यांनी भुजबळ यांना विनंती केली आहे, असे कळते.
श्री. भुजबळ हे ओबीसी नेते आहेत. नाशिक मतदार संघातील ओबीसी घटकांचा पाठिंबा मिळविण्यासाठी शांतिगिरी महाराज यांनी भुजबळ यांना विनंती केली आहे, असे कळते. या संदर्भात मतदारसंघातील सध्याची स्थिती गोंधळाची आहे. महायुतीचे अनेक नेते एक दिलाने प्रचारात आले असले तरीही, कार्यकर्ते मात्र सैरभैर असल्याचे चित्र आहे.
श्री. भुजबळ यांनी मराठा आरक्षण आंदोलनाबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे ते चर्चेत आहेत. त्यामुळे भुजबळ यांचे समर्थक नाशिक मतदारसंघातून महायुतीची उमेदवारी न मिळाल्याने नाराज आहेत. या पार्श्वभूमीवर भुजबळ समर्थक कार्यकर्ते हे त्या निवडणुकीत कोणाला मदत करतात, हा उत्सुकतेचा विषय आहे.
महायुतीतील नेते असूनही उमेदवार खासदार हेमंत गोडसे यांना भुजबळ समर्थकांची कितपत मदत होते. हा चर्चेचा विषय आहे. याची जाणीव झाल्याने महायुतीचे उमेदवार खासदार गोडसे यांनी देखील दोन दिवसांपूर्वी भुजबळ यांची भेट घेतली होती. श्री. भुजबळ यांनी या बैठकीत हेमंत गोडसे यांना महायुतीचे नेते म्हणून सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले होते.
(राजकारणातील महत्वाच्या बातम्यांच्या अपडेटस॒साठी सरकारनामाचे अधिकृत WhatsAppचॅनेल फॉलो करा)
श्री. भुजबळ उमेदवार खासदार गोडसे यांच्या साठी सभा देखील घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर शांतिगिरी महाराज यांनी मंत्री भुजबळ यांची घेतलेली भेट राजकीय डावपेचाचा भाग म्हणून पाहिला जातो. या भेटीमुळे महायुतीतील कार्यकर्त्यांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया आहे.
Edited By : Umesh Bambare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.