Suhas Kande, Chhagan Bhujbal Sarkarnama
नाशिक

Suhas Kande on Chhagan Bhujbal : सुहास कांदेंचा भुजबळांवर घणाघात; राजीनामा द्या अन॒ खुशाल तुतारीचे काम करा...

Chhagan Bhujbal मंत्री छगन भुजबळ आणि आमदार सुहास कांदे यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. दोघेही महायुतीतच एकत्र आहेत.

सरकारनामा ब्यूरो

Nashik News : शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर घाणाघाती आरोप केला आहे. मंत्रीपद महायुतीच्या कोट्यातून आणि काम तुतारीचे करायचे. एवढाच तुतारीचा पुळका असेल तर मंत्रीपदाचा राजीनामा द्या आणि खुशाल तुतारीचे काम करा, असा सल्ला कांदे यांनी भुजबळांना दिला आहे.

लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीतील वाद चव्हाट्यावर आला आहे. शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी थेट मंत्री छगन भुजबळ यांच्यावरच आरोप केला आहे. यावर मात्र, भुजबळांनी बोलणे टाळून विषयाला बगल दिली आहे. मंत्री छगन भुजबळ आणि आमदार सुहास कांदे यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. दोघेही महायुतीतच एकत्र आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा या वादाला तोंड फुटल्याने महायुतीतील उमेदवारांसाठी हा वाद डोकेदुखी ठरणार आहे. सुहास कांदे यांनी म्हटले की, मंत्रीपद महायुतीच्या कोट्यातून घ्यायचं आणि काम तुतारीचे करायचे. एवढाच जर तुतारीचा पुळका असेल तर मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा व खुशाल तुतारीचे काम करावे, असा घाणाघाती आरोप नांदगाव येथे आयोजित शिवसेना कार्यकर्ता मेळावा व पक्ष प्रवेश सोहळ्यात श्री कांदे बोलत होते.

(राजकारणातील महत्वाच्या बातम्यांच्या अपडेटस॒साठी सरकारनामाचे अधिकृत WhatsAppचॅनेल फॉलो करा)

श्री. कांदे म्हणाले, एवढेच नाही तर दिंडोरी लोकसभेच्या डॉ.भारती पवार यांना नांदगावमधून मिळणाऱ्या मताधिक्क्याचे श्रेय शिवसेनेला मिळू नये यासाठी मंत्री भुजबळ हे षडयंत्र करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. दरम्यान, या आरोपावर बोलताना छगन भुजबळ यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे.

त्यांनी म्हटेल की, आमचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्यकर्ते महायुतीचेच काम करताहेत. ज्या ठिकाणी आमदारांशी आपले पटत नसेल त्या ठिकाणी स्वतंत्र यंत्रणा, स्वतंत्र्य कार्यालय उभारून महायुतीच्या उमेदवाराचे काम करायचे असे कार्यकर्त्यांना सांगितले आहे. बाकी कोणाच्या आरोपाला मी उत्तर देणार नाही, असे सांगून भुजबळांनी या विषयावर बोलणे टाळले.

Edited By : Umesh Bambare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT