Thane MahaPalika News : ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 75 नगरसेवक निवडून आले आहेत. या विजयानंतर गुरुवारी शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांनी गटनेते पवन कदम यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईतील कोकण भवन येथे जाऊन शिवसेना गटाची अधिकृत नोंदणी केली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पाठिंब्यावर निवडून आलेल्या अपक्ष नगरसेविका प्रमिला केणी यांनीही शिवसेनेला पाठिंबा दिल्याने एकच खळबळ उडाली. त्यांचा पाठिंबा हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना धक्का मानला जातो आहे.
बुधवारी पक्षाकडून ज्येष्ठ नगरसेवक पवन कदम यांची गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर शिवसेनेने गटनोंदणी पूर्ण करत महापालिकेतील ताकद औपचारिकरीत्या दाखवून दिली. यावेळी कळवा प्रभाग क्रमांक 23 मधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुरस्कृत म्हणून निवडून आलेल्या नगरसेविका प्रमिला केणी यांनीही शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला.
केणी यांनी आधी स्वतंत्र अपक्ष गटाची नोंदणी केली. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला अधिकृत पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे शिवसेनेला पाठिंबा देणाऱ्या नगरसेवकांची संख्या आता 76 वर पोहोचली आहे. विशेष म्हणजे, प्रमिला केणी यांना यावेळी शिवसेनेकडून उमेदवारी नाकारण्यात आली होती.
त्यानंतर केणी यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने त्यांच्या उमेदवाराची उमेदवारी मागे घेत, केणी यांना पुरस्कृत जाहीर केले होते. या लढतीत प्रमिला केणी यांनी शिवसेना उमेदवार मनाली पाटील यांचा पराभव केला होता.
ठाणे महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे 12 नगरसेवक निवडून आले आहेत. अपक्ष नगरसेविका प्रमिला केणी यांना सोबत घेत पक्षाने एका स्वीकृत नगरसेवकपदावर दावा करण्याची तयारी केली होती; मात्र केणी यांनी शिवसेनेला पाठिंबा दिल्याने शरद पवार यांच्या पक्षाच्या संख्याबळात घट झाली आहे. परिणामी, स्वीकृत नगरसेवक पाठवण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना धक्का बसला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.