Ajit Srushti at Pimpri Chinchawad: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मित निधनानंतर त्यांच्या विकासात्मक कार्याची अजूनही चर्चा सुरु आहे. पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासात अजित पवारांचं मोठं योगदान आहे. त्याचमुळं त्यांच्या स्मरणार्थ या शहरात अजितसृष्टी उभारण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी केली आहे. हे स्मारक नेमकं कसं असेल याची माहितीही त्यांनी दिली आहे.
महेश लांडगे यांनी ट्विट करुन अजित पवारांच्या स्मारकाबाबत माहिती दिली आहे. यात ते म्हणतात, दिवंगत अजितदादांच्या स्मरणार्थ पिंपरी-चिंचवडमध्ये ‘अजित सृष्टी’ उभारण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. यासंदर्भात पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाला तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नवनिर्वाचित नगरसेवकांच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत या प्रस्तावास मंजुरी देण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड शहर देशातील क्रमांक एकचे शहर बनवण्याचे दिवंगत अजितदादांचे स्वप्न पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. ‘अजित सृष्टी’च्या माध्यमातून अजितदादांची विकासदृष्टी, लोककल्याणाची भावना आणि शहराच्या प्रगतीसाठीचे योगदान पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.
दरम्यान, अजित पवारांच्या निधनानंतर त्यांच्या आठवणीत अनेकांनी अजितदादांच्या विकासासंदर्भातील विधानांचे अनेक व्हिडिओज शेअर केले आहेत. यामध्ये प्रामुख्यानं त्यांचा सर्वाधिक व्हायरल झालेला व्हिडिओ म्हणजे पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अजित पवारांनी केलेल्या भाषणाचा. यामध्ये अजित पवार म्हणतात, "कारण मित्रांनो हे जग कायमचं राहणार आहे. तुम्ही-आम्ही आज असू उद्या नसू. काळाच्या नियतीच्या पुढे बोलावणं आल्यानंतर प्रत्येकाला जायचं आहे. परंतू आपण आपल्या हयातीत काम करत असताना समाजाला राजकारण हे काही सर्वस्व नाही. राजकारण हे होत असतं, राजकारण निवडणुका झाल्यानंतर विसरायचं असतं. पण ज्याच्यातून त्या भागात आर्थिक सुबत्ता येणार आहे, ते पाहिलं पाहिजे"
पिंपरी-चिंचवड शहराबाबत अजित पवारांचे काही प्लॅन्स होते. पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी जाहीरनाम्यातही राष्ट्रवादी काँग्रेसनं हे शहर देशातील क्रमांक एकचं स्वच्छ शहर बनवणार असल्याचं म्हटलं होतं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.