

Maratha Reservation ZP Election: गेल्या दीड-दोन वर्षापासून मराठवाड्यासह राज्यात झालेल्या मराठा आरक्षणाच्या लढ्याला मिळालेले यश, हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा अध्यादेश निघाल्यानंतर त्याचा समाजाला किती फायदा झाला यावर मतमतांतरे आहेत. हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा, नोंदींच्या आधारे कुणबी जातीचे प्रमाणपत्र आणि त्यानुसार ओबीसी आरक्षणाचा लाभ अनेकांना होत आहे. मराठा आरक्षण लढ्याचे हे यश असल्याचा दावा केला जात आहे. तर मराठा समाजातील एक गट ही सरकारने केलेली शुद्ध फसवणूक असल्याचा आरोप करत आहेत.
जिल्हा परिषद निवडणुकीत मात्र हैदराबाद गॅझेट लागू झाल्यानंतर कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे ओबीसी आरक्षणामुळे अनेकांची लॉटरी लागल्याचे समोर आले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणुकीत जिल्ह्यात सत्तरवर असे उमेदवार आहेत, ज्यांना या कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे लागू झालेल्या ओबीसी आरक्षणामुळे या प्रवर्गातून झेडपीच्या निवडणुकीत उमेदवारी दाखल करता आलेली आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत मराठा समाजातील अनेक नवं कुणबी ओबीसींना ओबीसी राखीव प्रवर्गातून उमेदवारीची लॉटरी लागली आहे. वेगवेगळ्या पक्षांकडून मराठा समाजातील अनेक नव ओबीसी उमेदवार आपलं नशीब ओबीसी राखीव प्रवर्गातून आजमावत आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये ओबीसी राखीव प्रवर्गात गेल्या दोन वर्षात 1967 च्या कुणबी नोंदीच्या आधारे ओबीसी प्रमाणपत्र मिळालेले अनेक मराठा उमेदवार मैदानात उतरले आहेत.
मनोज जरांगे पाटील यांनी ऑगस्ट 2023 मध्ये उभारलेल्या आंदोलनानंतर माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची समिती नेमून 1967 च्या जीआर नुसार जुन्या कुणबी नोंदीची मराठवाड्याचा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात तपासणी करण्यात आली होती. त्या मिळालेल्या नोंदीच्या आधारावर गेल्या दोन वर्षात ज्यांनी कुणबी प्रमाणपत्र मिळवलेली आहेत, त्यातील अनेक जण आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित गटात मराठा ओबीसी उमेदवार मैदानात आहेत. त्याचीच सध्या निवडणुकीत चर्चा जोरात सुरू आहे. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 63 जागांपैकी 17 गट हे ओबीसीसाठी राखीव आहेत, त्या ठिकाणी, गेल्या दोन वर्षात नव्याने कुणबी मराठा ओबीसी प्रमाणपत्र मिळवलेले उमेदवार आहेत तर काहीजण जुन्या कुणबी प्रमाणपत्रावर निवडणुका लढवत आहेत. त्यात जिल्हा परिषदेच्या गटात जवळपास 31 तर तर पंचायत समितीच्या 39 नवं ओबीसीना सर्व पक्षांतर्फे उमेदवारी देण्यात आली आहे.
पण निवडणुकीमध्ये ओबीसी मराठा असं मतांचे विभाजन होऊ नये म्हणून जे नव्या प्रमाणपत्राच्या आधारावर निवडणूक लढवत आहेत ते सध्या तरी मी नवीन ओबीसी प्रमाणपत्रावरचा उमेदवार आहे असं सांगायला पुढे येताना दिसत नाहीत. फुलंब्री तालुक्यात वडोद बाजार जिल्हा परिषद गट ओबीसीसाठी राखीव आहे. या ठिकाणी 3 ओबीसी मराठे निवडणुकीच्या मैदानात आहेत.
सोयगाव : आमखेडा (ओबीसी महिला)
सिल्लोड : शिवना (ओबीसी महिला), अंभई-ओबीसी
फुलंब्री : बाबरा, वडोदबाजार (ओबीसी)
वैजापूर : शिऊर, घायगाव (ओबीसी)
गंगापूर : तुर्काबाद, नेवरगाव (ओबीसी महिला), शेंदुरवादा (ओबीसी)
छत्रपती संभाजीनगर : गोलटगाव, वडगाव कोल्हाटी उत्तर-पूर्व (ओबीसी महिला), सावंगी (ओबीसी)
पैठण : आडुळ, दावरवाडी, ढोरकीन (ओबीसी महिला)
खुलताबाद : वेरूळ (ओबीसी)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.