Sunil Tatkare: अजितदादांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्रीपद कोणाकडं जाणार? राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर तटकरे काय म्हणाले?

Sunil Tatkare: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर आता अनेक राजकीय विषयांबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत.
Sunil Tatkare
Sunil Tatkare
Published on
Updated on

Sunil Tatkare: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर आता अनेक राजकीय विषयांबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत. यामध्ये पक्षाचं अध्यक्षपद आणि उपमुख्यमंत्रीपद कोणाकडं जाणार? यावरही चर्चा सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची आज मुंबईतील कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याबाबतची माहिती जाणून घेण्यासाठी माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडं विचारणा केली. पण याबाबत तटकरेंनी कुठलीही पत्रकार परिषद घेतली नाही.

Sunil Tatkare
ZP Election: मराठा आरक्षणाच्या लढ्यामुळं 'झेडपी'त अनेकांना संधी; हैदराबाद गॅझेट लागू झाल्यानं लॉटरी

माध्यमांशी बोलताना तटकरे म्हणाले, "माझी आज कुठलीही पत्रकार परिषद नाही. दादांच्या अकाली जाण्यातून आम्ही कोणीही अद्याप सावरलेलो नाहीत. अजूनही आम्हाला वाटतंय की दादा आमच्यामध्येच आहेत. शोकमग्न अवस्थेतच आम्ही सर्वजण आहोत. त्यामुळं आज राष्ट्रवादीच्या कार्यालयात येणं हे देखील माझ्यासाठी अत्यंत क्लेशकारक आहे. ज्या कार्यालयातून त्यांनी संघटन उभं केलं, तिथं त्यांच्यासमोर नतमस्तक व्हावं याच विनम्र भावनेनं मी इथं आलो होतो.

Sunil Tatkare
Mahadev Jankar News : पुढच्या विधानसभेत रत्नाकर गुट्टे दिसणार नाहीत! आपल्याच पक्षाच्या आमदाराविरोधात महादेव जानकरांचा एल्गार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या भेटीबाबत तटकरे यांनी सांगितलं की, मुख्यमंत्र्यांशी भेट जरुर झाली, सुनेत्रा वहिणी आणि त्यांचा परिवार सध्या धार्मिक विधीमध्ये आहे. हा धार्मिक विधी झाल्यानंतर आम्ही सर्व परिवाराशी देखील चर्चा करु त्यानंतर आम्ही जे काही ते ठरवू. जनतेच्या मनातील, आमच्या आमदारांच्या मनातील जे काही आहे ठरवू. वहिणींच्या सोबत आणि परिवाराशी बोलणं हे आमच्या सर्वांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं आहे, संवेदनशील आहे आम्ही प्रत्येक कृती त्यानुसार करु. दादांनी ज्या पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्र घडवला, आज आपण पाहतो आहोत की त्यांच्या दुःखद निधानानं संबंध राज्य शोकमग्न आहे. दादांचे सर्वस्पर्शी पैलू संपूर्ण महाराष्ट्रानं अनुभवलेले आहेत, त्याच शोकमग्न दुःखद वातावरणात आम्ही आहोत.

Sunil Tatkare
Rohit Pawar Emotional : दादा, फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून पुन्हा.., एकदा घट्ट मिठी मारायचीय..; रोहित पवार रक्षादर्शनावेळी हेलावले

मुख्यमंत्र्यांशी भेट झालीच कालही ते अत्यंसंस्काराला आले होते. पण बाकीचा जो राजकीय विषय असेल त्याबाबत आमची कोणतीही चर्चा झाली नाही, अशा शब्दांत सुनील तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com