Pimpri Chinchwad News: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उद्यान विभागातील सहाय्यक निरीक्षक किरण अर्जून मांजरे (वय ४६) याला त्याच्या कार्यालयातच १७ हजार रुपयांची लाच घेताना काल पकडण्यात आले होते. या लाचखोरीत त्याच्याच विभागाचा उपलेखापाल संजय देवराम काळभोर (वय ५६) याचाही सहभाग आढळल्याने त्याला आज `एसीबी`ने अटक केली.दोघांना १० जूनपर्यंत एसीबी कोठडी पुण्यातील विशेष न्यायालयाने सुनावली आहे.
दरम्यान,वाढत्या लाचखोरीमुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेची पुरती नाचक्की झाली आहे. प्रशासकीय राजवट आल्यानंतर एसीबीचे महापालिकेतील ट्रॅप वाढले आहेत.त्यातून प्रशासकीय राजवटीतही लाचखोरी वाढल्याचे स्पष्ट होत आहे.गेल्या अडीच महिन्यात पिंपरी महापालिकेत एसीबीचे दोन ट्रॅप झाले आहेत.त्यातून प्रशासक तथा आयुक्त शेखरसिंह यांचा आपले कर्मचारी व अधिकाऱ्यांवर वचक नसल्याचे स्पष्ट झाले आहे. (Pimpri Chinchwad News)
पालिके(PCMC) चा मिळकतकर, पाणीपुरठा विभाग आणि आता उद्यान विभागातील लाचखोरी गेल्या काही महिन्यात समोर आली आहे.तर, त्याअगोदर १८ ऑगस्ट २०२१ ला पालिकेच्या स्थायी समितीतील टक्केवारी तथा भ्रष्टाचारावर शिक्कामोर्तब झाले होते.त्यादिवशी स्थायी समितीची बैठक होती.
त्याच दिवशी एक लाख १८ हजार रुपयांची लाच घेताना स्थायी समिती सभापती, त्यांचा पीए, दोन लिपीक व शिपाई अशा पाचजणांना अटक झाल्याने पालिकेत मोठी खळबळ उडाली होती. हे सर्व एसीबीचे ट्रॅफ हे महापालिकेच्या तरुण अशा नव्या दमाच्या ठेकेदारांनी दिलेल्या तक्रारीवर झाले ही विशेष बाब आहे.
त्याचदिवशी एक लाख १८ हजार रुपयांची लाच घेताना स्थायी समिती सभापती, त्यांचा पीए, दोन लिपीक व शिपाई अशा पाचजणांना अटक झाल्याने पालिकेत मोठी खळबळ उडाली होती. हे सर्व एसीबी(ACB)चे ट्रॅफ हे महापालिकेच्या तरुण अशा नव्या दमाच्या ठेकेदारांनी दिलेल्या तक्रारीवर झाले, विशेष.
बुधवारी( दि.७) पिंपरी-चिंचवडमधील महापालिकेच्या उद्यानांच्या देखभालीचे काम केलेल्या ठेकेदाराचे बिल मंजूर करण्यासाठी मांजरेने लाच घेतली.त्यासाठी त्याला काळभोरने सहाय्य केल्याचे तपासात दिसल्याने एसीबीने त्यालाही अटक केली.याबाबत भोसरी एमआय़डीसी पोलिस ठाण्यात गुन्हा एसीबीने दाखल केला आहे.त्याचा तपास त्यांचेच पीआय श्रीराम शिंदे हे करीत आहेत.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.