Pune Fraud Case News: 'पीएमओ'त सचिव असल्याचं सांगणाऱ्या तोतया 'आयएएस' अधिकाऱ्याने 42 लाखांना गंडविले

Fraud Case : चतु: शृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सनदी अधिकारी म्हणून तायडे हा एका कार्यक्रमात चमकोगिरी करत होता.
Fraud Case
Fraud CaseSarkarnama
Published on
Updated on

Pune News : शिरूरचे (जि.पुणे) खासदार डॉ.अमोल कोल्हे यांचा पीए (स्वीय सहाय्यक) असल्याचे सांगून फसवणूक करणाऱ्या रविकांत मधुकर फसाळे (वय ३२) या तोतयाच्या मुसक्या नंदुरबार पोलिसांनी मंगळवारी (दि.६)आवळल्या. तर,'सीएमओ'चा 'पीआरओ' असल्याचे सांगून फसवणूक करणारा भामटा राहुल राजेंद्र पलांडे (वय ३१) याला पिपरी-चिंचवड पोलिसांनी गेल्या महिन्याच्या २५ तारखेला पकडले होते.

त्यानंतर या तोतयेगिरीची हॅटट्रिक होऊन पीएमओत सचिव असल्याचे सांगणारा बोगस आयएएस अधिकारी विनय देव ऊर्फ वासुदेव निवृत्ती तायडे हा पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे.

Fraud Case
Beed Bjp News : म्हस्के लोकसभा निवडणूक प्रमुख, मुंडे, धसांवर विधानसभेची जबाबदारी...

फसाळे आणि पलांडे या दुक्कलीने अनेकांना गंडा घातला आहे. फसाळेने नंदूरबार पोलिसां(Police)चीच फसवणूक केली आहे. पलांडेने अनेक गरजू विद्यार्थ्यांना पुण्यासह बंगळूर येथील नामाकिंत शिक्षण संस्थांत प्रवेश देतो,असे सांगून त्यांच्या पालकांकडून लाखो रुपये उकळल्याचा संशय आहे. तर,४२ लाख रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा तायडेविरुद्ध काल तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात नोंद झाला आहे. त्यात त्याची बायकोही आरोपी आहे.

कारण फसवणुकी(Fruad)ची काही रक्कम तिने स्वीकारलेली आहे, असे तळेगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सत्यवान माने यांनी आज `सरकारनामा`ला सांगितले. मात्र,तायडे सध्या चतुशृंगी पोलिसांच्या ताब्यात असल्याने आम्ही नंतर त्याचा ताबा घेऊ,असे ते म्हणाले.

Fraud Case
16 MLA Disqualification : '...तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा निर्णय क्रांतीकारी ठरेल'

तायडे हा चतु: शृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सनदी अधिकारी म्हणून एका कार्यक्रमात चमकोगिरी करीत होता.त्यावेळी एका दक्ष नागरिकाला त्याचा संशय आला. त्यांनी त्याबाबत पोलिसांना माहिती दिली आणि तायडेचा भंडाफोड झाला. त्यानंतर त्याच्या फसवणुकीला बळी पडलेल्या भंडारा(Bhandara) येथील मनिष ऊर्फ मेघेंद्र हेमकृष्ण कापगते (वय ४२,मु.पो.ता.साकोली)यांनी काल तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

त्यांची गेल्यावर्षी तायडेने ४२ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. 'पीएमओ'त (पंतप्रधान कार्यालय)सचिव असल्याचे सांगून त्याने कापगते य़ांच्याकडून ४२ लाख रुपये त्यांना नवीन सैनिक शाळेचा प्रस्ताव मंजूर करून देतो असे सांगून घेतले आहेत.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com