Sanjog Waghire patil, Shrirang Barne sarkarnama
पिंपरी चिंचवड

Loksabha Election 2024 : मावळात २००९ ची पुनरावृत्ती होणार; पण, खासदार पिंपरी-चिंचवडकरच असणार...

NCP गतवेळच्या आणि यावेळच्या लोकसभा लढतीत शिरुर आणि मावळमध्ये अनेक साम्ये आहेत. शिरुरला दोन्ही राष्ट्रवादी, तर मावळमध्ये दोन्ही शिवसेना गटात हा सामना होणार आहे.

Uttam Kute

Pimpari News : पुणे जिल्ह्यातील मावळ आणि शिरुर या दोन लोकसभा मतदारसंघात यावेळी गतवेळसारखी तिरंगी नाही, तर दुरंगीच होणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. या दोन्ही ठिकाणी आघाडी विरुद्ध युती अशीच लढत होणार असून यावेळी शिरुरला २०१९,तर मावळात २००९ च्या लोकसभा निवडणुकीची पुनरावृत्ती होणार आहे.

गतवेळच्या आणि यावेळच्या लोकसभा लढतीत शिरुर आणि मावळमध्ये अनेक साम्ये आहेत.शिरुरला दोन्ही राष्ट्रवादी,तर मावळमध्ये दोन्ही शिवसेना गटात हा सामना होणार आहे.२०१९चेच मुख्य प्रतिस्पर्धी शिवाजीराव आढळराव-पाटील आणि डॉ.अमोल कोल्हे हे २०२४ला ही पुन्हा शिरुरला भिडणार आहेत. फक्त यावेळी त्यांचे पक्ष आणि निवडणूक चिन्ह बदललं आहे.मागील वेळी आढळराव हे शिवसेना,तर कोल्हे राष्ट्रवादीचे उमेदवार होते. आता

आढळराव हे अजित पवार राष्ट्रवादी कॉंग्रेस,तर कोल्हे हे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उभे आहेत. मागील निवडणुकीत कोल्हेंनी आढळरावांचा खासदारकीचा चौकार चुकवत त्यांना पराभूत केलं होतं.त्याचं उट्ट काढण्याची संधी आढळरावांना यावेळी आहे. मावळात गतवेळी गाववाला विरुद्ध बाहेरचा उमेदवार अशी लढाई होऊन त्याचा फायदा स्थानिक म्हणजे पिंपरी-चिंचवडकर श्रीरंग बारणे यांना झाला होता.

त्यांनी बारामतीच्या पवार कुटुंबातील पार्थ अजित पवारांचा दोन लाख १४ हजाराच्या लीडने पराभव केला होता. यावेळी, मात्र बारणे (शिंदे शिवसेना) आणि संजोग वाघेरे-पाटील (ठाकरे शिवसेना) असा पुन्हा दोघा पिंपरी-चिंचवडकरांतच सामना रंगणार आहे.२००९ ला शिवसेनेचे गजानन बाबर यांनी राष्ट्रवादीचे आझमभाई पानसरे यांचा ऐंशी हजार ६१९ एवढ्या मताधिक्याने पराभव केला होता.

पानसरे हे शहरातील पिंपरी विधानसभा मतदारसंघातील आहेत. यावेळचे बारणेंचे प्रतिस्पर्धी वाघेरे हे पिंपरीतील आहेत. हे दोघेही पिंपरी-चिंचवड महापालिकेत नगरसेवक होते. दोघेही मराठा आहेत. दोघांचेही मोठे नातेगोते शहर व परिसरात आहेत. २००९ च्या पराभवाचं उट्टं काढण्याची संधी २०१४ ला पानसरेंना चालून आली आहे. कारण त्यांना मानणारा मतदार शहरात व त्यातही पिंपरी विधानसभा मतदारसंघात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिवाय शहरातील अल्पसंख्याक समुदायावर त्यांचे वर्चस्व आहे. ते सध्या आघाडीतील शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत. तर, वाघेरे हे आघाडीतील ठाकरे शिवसेनेचे उमेदवार आहेत. पिंपरीत राष्ट्रवादीचेच आमदार अण्णा बनसोडे आहेत. पक्षातील फुटीनंतर त्यांनी अजित पवारांची साथ दिली असली, तरी या मतदारसंघात राष्ट्रवादी आणि पानसरेंचा प्रभाव आहे.

त्याचा फायदा उठवून २००९ च्या पराभवाचा बदला ते घेतात याकडे आता लक्ष लागले आहे. एकमात्र निश्चीत आहे की, मावळचा खासदार हा पिंपरी-चिंचवडकर आणि शिवसेनेचाच होणार,पण तो कुठल्या शिवसेनेचा त्यासाठी ४ जूनची वाट पहावी लागणार आहे. बारणेंच्या खासदारकीच्या हॅटट्रिकचा रेकॉर्ड होणार ती वाघेरे हुकविणार हे ही त्याचदिवशी कळणार आहे.

Edited By : Umesh Bambare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT