Pimpari Chinchwad Politics : चंद्रकांत नखातेंनी दुसऱ्यांदा वाढवले आमदार जगतापांचे टेन्शन

Shankar Jagtap वाढदिवस नखातेंचा असला,तरी त्यानिमित्त त्यांच्या लागलेल्या भावी आमदाराच्या फ्लेक्समुळे चिंचवडचे भाजप आमदार अश्विनी जगताप आणि त्यांचे दीर पक्षाचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांचे टेन्शन वाढल्याची चर्चा ऐकू आली.
Ashwini Jagtap, Chandrakant Nakate
Ashwini Jagtap, Chandrakant Nakatesarkarnama
Published on
Updated on

Pimpari News : भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते यांचा वाढदिवस मंगळवारी (ता.१२) दणक्यात साजरा केला.त्यानिमित्त त्यांच्या प्रभागासह (प्रभाग २८ ड, काळेवाडी, रहाटणी) संपूर्ण चिंचवड विधानसभा मतदारसंघात भावी आमदार म्हणून त्यांची भव्य होर्डिंग्ज लागल्याने त्याची मोठी चर्चा सुरु आहे.

दरम्यान,वाढदिवस नखातेंचा असला, तरी त्यानिमित्त त्यांच्या लागलेल्या भावी आमदाराच्या फ्लेक्समुळे चिंचवडचे भाजप आमदार अश्विनी जगताप आणि त्यांचे दीर पक्षाचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांचे टेन्शन वाढल्याची चर्चा ऐकू आली. कारण संपूर्ण चिंचवड मतदारसंघातील मोक्याच्या जागा आणि मोठे चौक अशा ४५ ठिकाणी हे भव्य होर्डिंग्ज झळकलेले आहेत. त्याची मोठी चर्चाही सुरु आहे.

दरम्यान, नखातेंनी आपला वाढदिवस आणि त्यांनी आपल्या प्रभागात रहाटणीत उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या वर्धापनदिनानिमित्त रक्तदान शिबिर घेऊन मोठ्या संख्येने रक्त जमा केले. अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) या गेल्यावर्षी फेब्रुवारीत झालेल्या पोटनिवडणुकीत विजयी झाल्या आहेत. त्यांचे पती आणि चिंचवड या मतदारसंघाच्या निर्मितीपासूनचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे गेल्यावर्षी ३ जानेवारीला कर्करोगाने निधन झाले. त्यामुळे चिंचवडला पोटनिवडणूक लागली.

Ashwini Jagtap, Chandrakant Nakate
Pune Political News : पुण्यातले खासदार लयभारी; खर्चासाठी एकापेक्षा एक वरचढ... कुणी किती निधी संपवला?

भावनेच्या लाटेचा फायदा घेण्यासाठी जगताप कुटुंबातील व्यक्तीलाच भाजप तिकिट देणार हे निश्चीत होते. फक्त ते लक्ष्मण जगतापांची पत्नी (अश्विनी) की भाऊ (शंकर) हे ठरत नव्हते.अखेर पत्नीला उमेदवारी मिळाली.पण,त्यापूर्वी त्यावेळी तीन टर्म नगरसेवक असलेल्या नखातेंनी इच्छूक असल्याचे सांगून पक्षाकडे उमेदवारी मागितली. त्यामुळे चिंचवडच्या पोटनिवडणुकीत ट्विस्ट आला होता. कारण जगताप कुटुंबाहेरील व्यक्तीने लढण्याचे धाडस केले होते.

नखातेंनी उमेदवारी मिळण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पुणे जिल्ह्याचे त्यावेळचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील अशा वरिष्ठ नेत्यांच्या भेटीही घेतल्या होत्या.तीनवेळा नगरसेवक राहिल्याने आता शहरासाठी काम करायचे आहे, असे सांगत त्यांनी आमदारकीसाठी दावा ठोकला होता.नंतर त्यांची समजूत काढण्यात आली.

राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा! )

Ashwini Jagtap, Chandrakant Nakate
Pimpari News : शिरुरचा पेच सुटला; मावळात भाजपचा दावा कायम

त्या सुप्त इच्छेतून भावी आमदार म्हणून त्यांच्या वाढदिवशी त्यांचे भावी आमदार म्हणून बॅनर लागल्याचे कळते.पण,त्यामुळे दिवाळीच्या आसपास होण्याची शक्यता असलेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षातूनच उमेदवारीसाठी स्पर्धा होण्याच्या भीतीने चिंचवडच्या आमदारांचे टेन्शन वाढले गेले असणार.अशीच काहीशी स्थिती त्यांच्या कुटुंबातीलच दुसरे इच्छूक शंकर जगताप यांचीही झालेली असणार य़ात शंका नाही.

Edited By : Umesh Bambare

Ashwini Jagtap, Chandrakant Nakate
Sangram Jagtap : खबरदार! ...तर गाठ माझ्याशी आहे; संग्राम जगतापांनी विरोधकांना का दिला थेट इशारा?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com