IPL Betting in Pimpri-Chinchwad : सध्या सुरु असलेल्या 'आयपीएल' सामन्यांवर ऑनलाईन सट्टा घेणाऱ्या सटोडियांच्या राष्ट्रीय टोळीतील पाचजणांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. ते एका मोठ्या राष्ट्रीय सट्टा टोळीचे सदस्य असल्याचा पोलिसांचा संशय आहे.
गोविंद प्रभूदास ललवानी (वय ४५), कन्हैयालाल सुगूनमल हरजानी (वय ६३), देवानंद प्रतापराय दरयानी (वय ५१), रमेश दयाराम मिरानी (वय ६३) आणि हरेश हनुमंत थटाई (वय ५८, सर्व रा. पिंपरी) यांना अटक केली आहे. तसेच घटनास्थळावरून पोलिसांनी १४ मोबाईल, लॅपटॉप, कॅलक्यूलेटरसह एक लाखाचे जुगाराचे साहित्य जप्त केले.
अधिक माहितीनुसार, चिंचवडगावातील (Chinchwad) मेट्रोपॉलिटन या उच्चभ्रू सोसायटीत बेटिंगचा हा अड्डा सुरु होता. मंगळवारी (ता. ११) मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल या संघांच्या सामन्यावर बेटिंग घेताना चिंचवडमधील बुकींना रंगेहाथ पकडण्यात आले. ताज ७७७ या त्यांच्या मोबाईलमधील अॅपवर टीव्हीवरील प्रक्षेपणाअगोदर एक बॉल दिसत होता. त्याचाच गैरफायदा घेत ही टोळी त्यावर सट्टा घेत होती.
'आयपीएल'वर सट्टा खेळला जात असल्याच्या तक्रारी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्याकडे आल्याने त्यावर कारवाईचा आदेश त्यांनी दिला होता. त्यानुसार गुन्हे शाखा सक्रिय झालेली आहे. या शाखेच्या युनीट दोनचे पोलीस अधीक्षक जितेंद्र कदम यांना चिंचवडमधील सट्टा अड्ड्याची टीप मिळाली. तसेच दिल्ली कॅपिटल विरुद्ध मुंबई इंडियन सामन्यावर 'बेटिंग' घेत असल्याची माहितीही मिळाली होती. त्यानुसार या युनीटच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पथकाने सहाव्या मजल्याावरील हा बेटिंगचा अड्डा धाड टाकून उध्वस्त केला.
क्रिकेट आणि सट्टा हे पूर्वीपासूनचे समीकरण आता अधिकच घट्ट होत चालले आहे. कसोटी आणि एक दिवसीय क्रिकेट सामन्यांनंतर आता सट्टा हा ट्वेंटी-२० वर खेळला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.