Aditya Thackeray on Shinde Group : ज्या लोकांना काहीच कमी केले नाही, ते अचानकपणे निघून गेले. ज्यांच्यासाठी काही करता आले नाही, ते लोक सध्या ठाकरेंसोबत आहेत. राज्यात फिरताना त्याची प्रचिती वारंवार येत आहे, असे सांगित मुंबईतील एका कार्यक्रमात ठाकरे गटाचे आमदार, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोरांवर टीका केली. तसेच यापुढे त्यांच्याविरोधात दोन हात करत लढणार असल्याचा निर्धारही आदित्य यांनी यावेळी केला.
आपण ज्यांच्यासाठी सर्व काही करतो, अशा लोकांवर किती विश्वास ठेवायचा, असा प्रश्न पडत असल्याची खंत आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी यावेळी व्यक्त केली. ते म्हणाले,"नऊ महिन्यांपूर्वी पक्ष फोडून काही लोक निघून गेले. त्यांच्याबद्दल अनेक जण प्रश्न विचारतात. या प्रकरातून काय धडा घेतलात? असे का घडले असेल, असे त्यांचे प्रश्न असतात. पण खरे सांगतो फिरतीवर असल्यामुळे अशा गोष्टींचा विचार करायला वेळच मिळाला नाही. आताही अनेक लोक पक्ष सोडून जातात. अनेकजण पक्षात येतात. मात्र कधी एकटा असल्यावर मनात विचार येतो की जे निघून गेले त्यांना काय कमी केले होते. त्यामुळे आता माणसांवर विश्वास किती ठेवायचा? ज्यांना सगळे दिले ते निघून गेले आणि ज्यांना काही मिळाले नाही, ते आता सोबत आहेत."
बंडखोरीनंतर माझ्यासह अनेक जणांना वाईट वाटले. मग उद्धवसाहेब (Uddhav Thackeray) काय विचार करत असतील, अशी भावनाही आदित्य यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, "फुटलेल्या सर्वांना नगरसेवकाच्या तिकिटापासून ते मंत्री बनवण्यापर्यंत हे उद्धवसाहेबांनी सर्व काही केले. त्यामुळे एखादी व्यक्ती तुमच्यावर इतका विश्वास टाकते, काही न मागता सगळे देते, अशा माणसाच्या पाठीत खंजीर खुपसता, खोटे बोलता. त्याची बदनामी करता. इतकी वर्षे त्यांना कुटुंबातील सदस्य मानले. मला या प्रकारामुळे वेदना होत आहेत. तर माझे वडील काय विचार करत असतील, याचा मी विचार करतो. "
दरम्यान, सर्वांच्या नजरेत मी भरण्याचे काहीच कारण नव्हते. मी सर्वांना मानसन्मान देत होतो. मात्र त्यांना माझी का भिती वाटली, हेच समजले नसल्याचे ठाकरे यावेळी म्हणाले. आदित्य ठाकरे यांनी सांगितले की, "मानसन्मान देऊनही त्यांना माझी भीती वाटायला लागली होती. ती का व कशासाठी मला माहिती नाही. प्रत्येक बैठकीत त्यांना प्राधान्य द्यायचो, सगळ्यांचा आदर सन्मान राखत आलो. आता मागे हटाणार नाही. या घटनेला आता नऊ महिने झाले आहेत. हा काळ एक प्रवास ठरला. यापुढेही कायम लढत राहणार आहे. म्हणतात ना मै नहीं तो कौन बे?"
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.