Pimpri- Chinchwad Latest News Sarkarnama
पिंपरी चिंचवड

PCMC : प्रशासक राजवटीत पिंपरी महापालिकेत रेकॉर्ड ब्रेक कारवाई, वर्षात सात कर्मचारी गेले घरी

Worker Suspend : लाचखोरीसह फौजदारी गुन्ह्यांत महापालिकेचे सात कर्मचारी, अधिकारी यावर्षी आतापर्यंत सस्पेंड झाले आहेत. ही रेकॉर्ड ब्रेक कारवाई आहे.

Uttam Kute

Political News : पिंपरी-चिंचवड महापालिकेत गेल्या पावणेदोन वर्षांपासून प्रशासकीय कारभार सुरु असून या कालाधीत तेथील कर्मचारी व अधिकारी बेशिस्त झाल्याचे दिसत आहेत. त्यांच्यावर वचक न राहिल्याने भ्रष्टाचार बोकाळला आहे. त्यातून लाचखोरीसह फौजदारी गुन्ह्यांत महापालिकेचे सात कर्मचारी,अधिकारी यावर्षी आतापर्यंत सस्पेंड झाले आहेत. ही रेकॉर्डब्रेक कारवाई आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सहाय्यक आरोग्य अधिकारी राजेश भाट (वय ५४) यांना त्यांच्या केबिनमध्ये घुसून त्यांच्याच कार्यालयातील सफाई कामगार शंकर मुरलीधर सोनवणे (वय ३२) याने भाजपच्या माजी नगरसेविका सारिका लांडगे (Sarika Landge) यांचा पती संतोष लांडगे आणि आणखी एक अशा तिघांनी ५ डिसेंबरला शिवीगाळ करीत मारहाण करीत केली होती. त्यातील सोनवणेला महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखरसिंह (shekhar sinh) यांनी शुक्रवारी घरचा रस्ता दाखवला.

महापालिकेने यापूर्वी मलईदार स्थापत्य विभागातील ज्युनिअर इंजिनीअर संतोष दत्तात्रय शिरसाठ याला आयुक्तांनी घरी बसवले आहे. त्याच्यानंतर आता सोनवणेंचा नंबर लागला. यामुळे प्रशासकीय कारभार नको रे बाबा, नगरसेवकांचाच तो बरा होता, असे म्हणण्याची वेळ पिंपरी-चिंचवडकरांवर आली आहे.

सोनवणे याला निलंबित करून त्याची खातेनिहाय़ चौकशीही लावण्यात आली आहे. गैरहजेरी आणि उद्धट वर्तनाबद्दल त्याचे वरिष्ठ भाट यांनी त्याला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्याचा राग येऊन त्याने पांजरपोळ, भोसरी येथील क्षेत्रीय कार्यालयात घुसून भाट यांना त्याने वरील दोघांसह शिवीगाळ आणि मारहाण केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यासोबतच ते त्यांना ओढून घेऊन चालले होते. त्यावेळी सोनवणे याने, तर मी तुमच्या नावे चिठ्ठी लिहून आत्महत्या करतो, अशी धमकीही दिली होती. त्याबद्दल सरकारी कामात अडथळा आणल्याचाही गुन्हा या तिघांविरुद्ध भोसरी पोलिस ठाण्यात नोंद आहे. सोनवणेच्या गैरवर्तुणुकीने महापालिकेची प्रतिमा जनमानसात मलिन झाल्याने त्याला सस्पेंड करीत असल्याचे आयुक्तांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

(Edited by Sachin Waghmare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT