Parliament Security Breach Case : आमच्या मुलाने जे काही कृत्य केले आहे ते बेरोजगारीतून आलेल्या निराशेमुळे केले आहे. त्याने पोलीस तसेच लष्करात जाण्याचे स्वप्न बघितले आहे. त्यासाठी तो तशी तयारी करत होता. आम्हाला आमच्या मुलाशी बोलणं करुन द्या. तो परत नाही आला तर मी आत्महत्या करणार असल्याचा इशारा अमोल शिंदे याचे वडील धनराज शिंदे यांनी दिला आहे.
अमोलसह चार युवक बुधवारी संसदेची सुरक्षा (Parliament Security) भेदून आतमध्ये गेले होते. याप्रकरणी चौघांना ताब्यात घेवून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमोल शिंदे हा लातूर (Latur) जिल्ह्यातील चाकुर तालुक्यातल्या झरी या गावाचा आहे. त्याचे आई-वडील मजुरी करतात. तर, तो अनेक दिवसांपासून पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी बाहेर गावी राहत होता. त्याचे वडील गावच्या मंदिरात झाडलोट करतात.
तर आई मिळेल ते मजुरीचे करते. त्याला दोन भाऊ आहेत. एक मंदिराच्या शिखराचे तर दुसरा फरशी फिटिंगचे काम करतो. त्याच्या एका बहिणीचे लग्न झाले आहे. पोलीस भरतीची तयारी करत असताना अमोलला अनेकदा प्रयत्न करूनही नोकरी लागत नव्हती. मागील काही दिवसांपासून तो सतत दिल्लीला जात असल्याचे देखील समोर येत आहे. संसदेची सुरक्षा भेदून चार युवक आतमध्ये गेले, त्यातील दोघांनी लोकसभेमध्ये (LokSabha) जाऊन धूर सोडला.
दोन तरूणांनी संसद परिसरात धुमाकूळ घातला. त्यानंतर या चौघांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यातील एक आरोपी अमोल शिंदे आहे. याप्रकरणी अमोलच्या पालकांनी प्रतिक्रीया दिली आहे. त्यात ते म्हणाले, आमचा मुलगा फक्त पोलीस आणि मिल्ट्री भरतीच स्वप्न पूर्ण करण्यासाठी काम करत होता. पात्रता असून ही मुलास नोकरी नाही मिळाली.
रोजगारी करणाऱ्या लोकांच्या मुलास नोकरी लागत नाही का असा सवाल धनराज शिंदे यांनी केला आहे. दिल्लीला जाण्याआधी विहीर खोदण्याचे काम केले असून त्यातून त्याला पाच हजार रुपये मजुरी मिळवली. दोन हजार उसणे घेवून तो दिल्लीसाठी गेला होता. त्याआधी त्याने भगतसिंह यांचा फोटो विकत घेतला होता.
तसेच त्यांचे आणि इतरांचे फोटो असलेला बनियन विकत घेतले. तेच घालून तो संसदेत गेला असल्याचे त्यांच्या पालकांनी सांगितले. अमोल शिंदे याच्या घरी बुधवारी पोलीस व दहशतवाद विरोधी पथकाने भेट देऊन घराची झडती घेत त्याच्या कुटुंबीयांची चौकशी केली. या घटनेमुळे पोलीस व गुप्तचर यंत्रणेने सतर्क होऊन तपास सुरू केला आहे. अमोलचे शिक्षण गावातच झाले असून त्याचा स्वभाव शांत आणि चांगला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दररोज कामाला जाणाऱ्या आई-वडिलांना देखील तो मदत करायचा. विशेष म्हणजे पोलीस भरतीसाठी सराव करतांना अमोल नेहमी धावण्याच्या स्पर्धेत नेहमीच प्रथम यायचा असे त्याच्या जवळच्या लोकांनी सांगितले. तसेच तो भगतसिंह यांच्या विचाराने प्रभावित होता. त्यांच्या आधारित अनेक पुस्तके वाचण्याचा आणि गोळा करण्याचा छंद त्याने जपला होता.
(Edited by Amol Sutar)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.