Election Sarkarnama
पिंपरी चिंचवड

By Election News : ..म्हणून चिंचवड, कसबा पेठच्या 'एक्झिट पोल'वर २७ फेब्रुवारीपर्यंत बंदी

Exit Poll Ban : उपमुख्य निवडणूक अधिकारी शरद दळवी यांची माहिती

सरकारनामा ब्युरो

Chinchwad, Kasba Election : चिंचवड, कसबा पेठसह देशातील पाच विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होत आहे. त्याच्या एक्झिट पोलवर निवडणूक आयोगाने सार्वत्रिक निवडणुकीप्रमाणे बंदी घातली आहे. एक्झिट पोलमुळे मतदानावेळी एका विशिष्ट उमेदवाराकडे कल जाण्याची शक्यता असते. ही बाब गृहित धरून त्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत.

२६ तारखेला चिंचवड आणि कसब्यासाठी मतदान (Kasba and Chinchwad By Election) आहे. मात्र, ते संपल्यानंतर २४ तास म्हणजे २७ तारखेच्या सायंकाळपर्यंत निवडणूकपूर्व निकाल अंदाज वर्तविण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे वृत्तवाहिन्यांना या मुदतीपर्यंत त्याबाबतचे अंदाज देता येणार नाहीत.

'एक्झिट पोल'मुळे मतदानाच्या वेळी एका विशिष्ट उमेदवाराकडे कल जाण्याची शक्यता गृहित धरून त्यावर निर्बंध टाकण्यात आले आहेत. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघात कोण विजयी होणार याचा आराखडा मतदान संपल्यावर एक दिवसापर्यंत कोणालाही मांडता येणार नाही.

दि. १६ ते २७ फेब्रुवारीच्या सायंकाळी सात वाजेपर्यंत ही बंदी आहे. त्यानुसार कोणत्याही व्यक्तीस मुद्रीत अथवा इलेक्ट्रॉनिक माध्यम किंवा इतर कोणत्याही माध्यमाद्वारे 'एक्झिट पोल' आयोजित करण्यास, प्रकाशित करण्यास आणि प्रसारित करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

राज्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे अवर सचिव तथा उपमुख्य निवडणूक अधिकारी शरद दळवी (Sharad Dalavi) यांनी ही माहिती दिली. लोकप्रतिनिधीत्व कायदा १९५१ च्या कलम १२६ (१) (ब) अन्वये असे करण्यास प्रतिबंध असल्याचे दळवी यांनी यावेळी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT