Chinchwad By-Election : एका अपक्षाची उमेदवारी खोक्यातून: कलाटेंविरोधात 'गद्दारी'ची बॅनरबाजी

राहूल कलाटे यांनी पक्षप्रमुखांची विनंती धुडकावून तेथे बंडखोरी केली आहे.
Chinchwad By-Election
Chinchwad By-ElectionSarkarnama
Published on
Updated on

Chinchwad By-Election : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत आघाडीत बंडखोरी झाली आहे. आघाडीतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नाना काटे हे उमेदवार असताना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पिंपरी-चिंचवड महापालिकेतील माजी गटनेते राहूल कलाटे यांनी पक्षप्रमुखांची विनंती धुडकावून तेथे बंडखोरी केली आहे. त्याचे पडसाद मतदारसंघात आता उमटू लागले आहेत.

आघाडीतील सर्व प्रमुख नेत्यांनी समजूत घालूनही उमेदवारी माघारीच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी (१० फेब्रुवारी) कलाटेंनी आपली उमेदवारी कायम ठेवली. त्यामुळे चिंचवडमध्ये थेट होणारी लढत आता तिरंगी झाली आहे. तसेच त्याचा फटका आपल्या उमेदवाराला बसण्याची भीती आघाडीला वाटते आहे. त्यातून कलाटेंविरुद्धचा रोष लगेचच २४ तासात व्यक्त झाला आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील चापेकर चौकातच त्यांच्याविरुद्ध फलक लागले आहेत. मोक्याच्या ठिकाणावर ते लावण्यात आल्याने ते लक्षवेधी ठरले आहेत. त्याची चर्चाही सुरु झाली आहे.

Chinchwad By-Election
Ravikant Tupkar : तुपकरांनी अंगावर पेट्रोल ओतलं..;पोलिसांच्या वेशात येऊन आत्मदहन..

या फलकावर ते कोणी लावलेत याचा उल्लेख नाही. मात्र, केशरी रंगातील या फ्लेक्सवर ...खरा शिवसैनिक असे नाव आहे. त्यामुळे कलाटेंनी बंडखोरी केल्याच्या रागातून ठाकरे शिवसैनिकाने ते लावल्याचा कयास वर्तविण्यात येत आहे.

एका अपक्षाची उमेदवारी खोक्यातून.. नागपूरची गुलामी..ठाण्याची गद्दारी...एकदम ओक्के डोक्यातून.. असा मजकूर या फलकावर आहे. त्यातून राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी जसे एकनाथ शिंदे समर्थक शिवसेनेच्या पन्नास आमदारांनी खोके (एक खोका म्हणजे एक कोटी रुपये) घेतल्याचा आरोप झाला. तसाच तो चिंचवडमध्ये आघाडीचा (राष्ट्रवादी) उमेदवार पाडण्याासाठी ही अपक्षाची (कलाटे) उमेदवारीही खोक्यातूनच असल्याचा अप्रत्यक्ष आरोप या फ्लेक्समधून करण्यात आला आहे. त्यासाठी या अपक्षाने नागपूरची (उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस) यांची गुलामी आणि ठाण्यासारखी (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे) गद्दारी केली असल्याचा दावाही त्यातून करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com