Shrirang Barne, Sunil Shelke News Sarkarnama
पिंपरी चिंचवड

Shrirang Barne: तळेगाव सीओ बदलीचा शेळकेंनी बारणेंवर केलेला आरोप निघाला खरा, पण....

Uttam Kute

Mawal Political News: गेल्या काही दिवसापासून मावळचे खासदार श्रीरंग बारणे व आमदार सुनील शेळके एकमेकांवर आरोप करण्याची संधी सोडत नाहीत तर दोघेही एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करीत असतात. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्यधिकारी विजय सरनाईक यांची टर्म पूर्ण व्हायच्या आत मावळचे खासदार (शिंदे शिवसेना) श्रीरंग बारणे (Shrirang Barne ) यांनी बदली करून अकार्यक्षम एन. के. पाटील यांना आणल्याचा आरोप स्थनिक आमदार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (अजित पवार) सुनील शेळके यांनी केला होता. तो खरा निघाला. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eaknath Shinde) यांना आपणच पत्र दिले होते, अशी कबुली बारणेंनी गुरुवारी दिली.

हे पत्र यावर्षी १२ मे २०२३ रोजी हत्या झालेले तळेगाव नगरपरिषदेतील माजी सत्ताधारी जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्या मागणीवरुन दिले होते,असे बारणेंनी स्पष्ट केले. सरनाईकांची बदली करून पाटील यांना का आणले, याचे उत्तर खा.बारणेंनी द्यावे, असे आव्हान आ. शेळकेनी परवा दिले होते. तसेच तळेगावच नाही, तर वडगाव मावळ, लोणावळा आणि देहू असे मावळातील सर्वच सीओ बारणेंनी आणल्याचा हल्लाबोल केला होता. त्याला बारणेंनी लोणावळा नगरपरिषदेच्या आढावा बैठकीनंतर उत्तर दिले. माझ्या त्या पत्राची प्रत शेळकेंना व्हाटसअपवर त्याचवेळी पाठवून दिली होती, याचीही आठवण त्यांनी करून दिली.

गेल्या नऊ वर्षात मतदारसंघात काय प्रकल्प आणले हे लोकसभा निवडणुकी वेळी सांगेन, असे उत्तर बारणेंनी शेळकेंच्या दुसऱ्या आरोपावर दिले. यावेळी मला होणारे मतदान आणि मिळणारे लीड हे राज्यातही मोठे असेल, असा मोठा दावा त्यांनी केला. २०१९ ला दिलेली आश्वासने बऱ्यापैकी पूर्ण केली असून राहिलेलीही पूर्ण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राष्ट्रवादी युतीत येण्यापूर्वी माझी २०२४ च्या लोकसभेची उमेदवारी फायनल झाली होती, याकडे त्यांनी लक्ष वेधले. २०१९ च्या लोकसभेला माझे प्रतिस्पर्धी पवार कुटुंबातील सदस्य असल्याने त्यावेळी माझा पराभव होईल,असे मिडियाने म्हटले होते.पण,मी निवडून येणार असे सांगितले होते आणि दोन लाख मतांनी निवडून आलो, हे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

(Edited by Sachin Waghmare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT