Assembly Election Exit Polls : लोकसभेच्या 'सेमी फायनल'मध्ये काँग्रेसची मुसंडी तर भाजपसाठी धोक्याची घंटा

5 State Assembly Election : मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, मिझोराम आणि तेलंगणाची निवडणूक भाजपसह काँग्रेसनेही प्रतिष्ठेची केली आहे.
Assembly Election Exit Polls
Assembly Election Exit Polls Sarkarnama
Published on
Updated on

New Delhi : राजस्थान,मध्य प्रदेश,छत्तीसगड,तेलंगणा आणि मिझोराम या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. या पाचही राज्यांचा निकाल येत्या रविवारी (ता.3 डिसें.)ला निकाल जाहीर होणार आहेत. पण त्याआधी एक्झिट पोल समोर आले आहेत.

या पोलनुसार निवडणुकांकडे पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची सेमी फायनल म्हणून पाहिले जात आहे. या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे.तर महाविजयाचा निर्धार केलेल्या भाजपसाठी ही धोक्याची घंटा असल्याचे बोलले जात आहे.

Assembly Election Exit Polls
Karnataka Election Exit Poll: कर्नाटकात कोण ठरणार किंग; काय सांगतात एक्झिट पोलचे आकडे?

लोकसभा निवडणुकीपूर्वीच पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा धुरळा उडाल्याने त्याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागलेले आहेत. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, मिझोराम आणि तेलंगणाची निवडणूक भाजपसह काँग्रेसनेही प्रतिष्ठेची केली आहे.प्रचारासाठी संपूर्ण शक्ती पणाला लावत विजयाचा दावा देखील केला होता.

आता त्याच निवडणुकांचे एक्झिट पोल समोर आले आहेत. यात मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर असल्याचे समोर येत आहे. (Assembly Election Exit Poll)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

एक्झिट पोलमध्ये (Exit Poll) मध्य प्रदेशच्या २३० जागांच्या विधानसभेत काँग्रेसला १११ ते १२१ जागा मिळतील व भाजपला १०६ ते ११६ जागा मिळतील असा अंदाज आहे.राजस्थान विधानसभेच्या १९९ मतदारसंघासाठी नुकतेच मतदान झाले.मात्र त्यात एबीपी न्यूज-सी व्होटरच्या अंदाजानुसार भाजपला राज्यात स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे.या पोलनुसार ९४ ते ११४ जागा भाजप,काँग्रेसला ८१-९१, तर इतरांना १४ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. त्यामुळे राजस्थानची परंपरा मोडीत काढत सध्यातरी काँग्रेस सत्तेत परतणार असल्याचा दावा फोल ठरणार की सत्यात उतरणार हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.


छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यात मतदान झाले.तेथील मतांची टक्केवारी 76.31 टक्के होती.जी 2018 च्या तुलनेत (76.88) किरकोळ कमी होती.आता 'पोलस्टार्ट'च्या पोलनुसार छत्तीसगडमध्ये काँग्रेस पुन्हा सत्ता राखण्याची शक्यता आहे, तर भाजपची सत्ता येणं कठीण असल्याचे समोर येत आहे.तर भाजपला 30 ते 35 जागा मिळण्याची शक्याता आहे,तर काँग्रेसला 40-45 जागा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

तर इंडिया टुडे-एक्सिस माय इंडिया या पोलनुसार, काँग्रेस(Congress) ला 40 ते 50 जागा तर भाजपला 36 ते 46 जागा तर इतर पक्षांना 1 ते 5 जागा मिळण्याची शक्यता आहे.

Assembly Election Exit Polls
Exit Poll Vs Opinion Poll : 'एक्झिट पोल' आणि 'ओपिनियन पोल'मध्ये नेमका फरक काय?

तेलंगणा विधानसभेच्या 119 जागांसाठी गुरुवारी मतदान पार पडले.यानंतर आता एक्झिट पोल समोर येत आहेत.या निवडणुकीत यश मिळवत केसीआर यांना सत्ता स्थापनेची हॅटट्रिक करायची होती,तर काँग्रेसला तेलंगणात पुनरागमन करायचे होते.दुसरीकडे भाजपनेही तेलंगणाची सत्ता काबीज करण्यासाठी कोणतीही कसर सोडली नव्हती.याव्यतिरिक्त ओवैसींच्या'एमआयएम'लाही राज्यातील ताकद वाढवायची होती. यामुळे तेलंगणाची निडणूक सर्वच पक्षांसाठी एकप्रकारे प्रतिष्ठेची बनली होती.

त्यानुसार यंदा तेलंगणात सत्ता परिवर्तन होणार असल्याचे दिसून येत आहे.'जन की बात'च्या एक्झिट पोलनुसार बीआरएस (BRS) 40-55 तर काँग्रेसला 48-64 जागा मिळणार असल्याचे समोर येत आहे.तसेच भाजप 7 ते 13 आणि एमआयएम 4 ते 7 जागा मिळणार असल्याचे एक्झिट पोलचे आकडे सांगत आहे.

Assembly Election Exit Polls
Shrirang Barne : मावळात लोकसभेला मीच उमेदवार; बारणेंनी केलं जाहीर, भाजप-राष्ट्रवादीची भूमिका काय ?

मिझोरममध्ये एकूण 40 जागांवर झालेल्या निवडणूक झाली. तिथे मिझो नॅशनल फ्रंट (MNF) आणि जोराम पिपल्स मुव्हमेंट (ZPM) यांच्यात काट्याची टक्कर दिसून येत आहेत. 'रिपब्लिक टीव्ही-जन की बात' यांच्या एक्झिट पोलमध्ये झेडपीएमला १५ ते २५ तर एमएनएफला १० ते १४ जागा मिळण्याची शक्यता आहे, तर काँग्रेसला ५ ते ९ आणि भाजपला २ जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

पोल स्टार्टच्या एक्झिट पोलमध्ये झेडपीएमला अधिक जागा दाखवण्यात आल्या आहेत. झेडपीएमला १५ ते २५,एमएनएफला १०-१४,भाजपला २ तर काँग्रेसला ५ ते ९ जागा मिळतील असा अंदाज मांडला आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Assembly Election Exit Polls
VIdhansabha winter session दहा दिवसांच्या हिवाळी अधिवेशनातून तरी शेतकऱ्यांच्या हाती काही लागेल का?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com