BJP Sarkarnama
राजकीय भविष्य

Political Horoscope BJP : उमेदवारीसाठी भाजपने का निवडला 28 ऑक्टोबरचा मुहूर्त?

Maharashtra Assembly Election 2024 : सध्याची राजकीय परिस्थिती बघता कोण निवडून येईल याची कोणालाच शाश्वती नाही. हे बघता कुंडलीतील ग्रह ताऱ्यांच्या भ्रमणानुसार आपलं राजकीय भविष्य जाणून घेण्यासाठी ज्योतिषांचाही सल्ला घेताना उमेदवार दिसत आहेत.

Rajesh Charpe

Political Horoscope BJP : भारतीय जनता पक्षाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. आज-उद्या काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना (Shivsena) हे पक्षही आपले उमेदवार जाहीर करणार आहेत. तिकीट मिळावे यासाठी अनेकांची खटपट सुरू आहे.

सध्याची राजकीय परिस्थिती बघता कोण निवडून येईल याची कोणालाच शाश्वती नाही. हे बघता कुंडलीतील ग्रह ताऱ्यांच्या भ्रमणानुसार आपलं राजकीय भविष्य जाणून घेण्यासाठी ज्योतिषांचाही सल्ला घेताना उमेदवार दिसत आहेत.

नागपूरचे (Nagpur) आंतरराष्ट्रीय ज्योतिषाचार्य डॉ. अनिल वैद्य यांनी उमेदवारांसाठी अर्ज भरण्याचा उत्तम मुहूर्त 24 ऑक्टोबर गुरुवार आणि 28 ऑक्टोबर सोमवार असल्याचे सुचविले आहे. या दिवशी उमेदवारी अर्ज भरणाऱ्यांना जिंकण्याची संधी अधिक असल्याचे भाकीत त्यांनी वर्तविले आहे.

विशेष म्हणजे भाजपने (BJP) 28 तारखेचा मुहूर्त निवडला आहे. 22 ऑक्टोबरपासून उमेदवारांनी अर्ज भरण्याची सुरुवात होणार आहे. अर्थात कुंडलीनुसार प्रत्येकाच्या कुंडलीतील ग्रहताऱ्यांचे भ्रमण कोणत्या राशीवरून होत आहे आणि कोणत्या स्थानावरून होत आहे. यावरून भविष्याचा वेध थोडाफार तरी घेणे शक्य होते. असे अनिल वैद्य यांनी सांगितले.

असे असले तरी उमेदवारांसाठी अर्ज भरण्याचे उत्तम मुहूर्त 24 व 28 ऑक्टोबर हेच आहेत. 23 ऑक्टोबर दुपारनंतर शुभ आहे. रवी स्वाती नक्षत्रात प्रवेश करणार असून भद्रा समाप्ती दुपारी एक वाजून 17 मिनिटांनी आहे. त्या दिवशी बुध ग्रहाचा उदय होणार असून अर्धा दिवस शुभ ग्रहांनी युक्त नाही. या दिवशी उमेदवारांनी अर्ज नाही भरला तरी चालेल परंतु निवडणुकीत (Election) यश मिळण्यासाठी खूप खर्च करावा लागू शकतो.

24 ऑक्टोबरला कालाष्टमी, कराष्ट्रमी, आठवी, गुरुपुष्यामृत योग आहे. 22 ते 28 ऑक्टोबर या सुमारास राजकारण्यांसाठी दैवत असलेला सूर्य महाराज तुला राशीत असून बुधादित्य योग बनतो आहे. त्याचप्रमाणे 28 रोजी अर्ज करणाऱ्यांना यश आपोआप चालून येऊ शकेल असे संकेत ग्रह देत आहेत.

या दिवशी रमा एकादशी, वसुबारस असून अत्यंत शुभ दिवस आहे. या दिवशी वातावरणात शुभ ग्रह चंद्र, शुक्र, गुरु, सूर्य वगैरेंचा शुभ प्रभाव मोठ्या प्रमाणात राहणार आहे. असे असले तरी ज्योतिष शास्त्रानुसार ज्या दिवशी मतदान आहे तो दिवस, उमेदवारांची त्या दिवसाची कुंडली आणि निकालचा दिवस उमेदवारासाठी कसा आहे हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT