Maharashtra Politics Horoscope : भविष्यनामा! फूट, पक्षांतर अन् मोठ्या राजकीय घडामोडींचा काळ...

Political Horoscope : महाराष्ट्रात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन गटांत मोठे वाद/हिंसा होण्याची शक्यता राहील. संप, बंद, आंदोलने यातून हिंसा होण्याची शक्यता राहील. निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे पोलिसांकडून मोठ्या कारवाया होतील.
Bhavishyanama 12.jpeg
Bhavishyanama 12.jpegSarkarnama
Published on
Updated on

सिध्देश्वर मारटकर

Maharashtra Politics Horoscope : या सप्ताहात मंगळ कर्क राशीत प्रवेश करणार असून रवीने तूळ राशीत प्रवेश केला आहे. या काळात रवी-हर्षल षडाष्टक योग होत असून मंगळ- प्लुटो प्रतियोग होत आहे. या योगामुळे या काळात गुन्हेगारीत मोठी वाढ झालेली दिसेल. मोठ्या व्यक्तींवर हल्ले, खून, मारामाऱ्या यांचे प्रमाण वाढण्याची शक्यता राहील.

मोठ्या राजकीय व्यक्ती, उद्योगपती यांच्यासाठी हा काळ प्रतिकूल राहील. या क्षेत्रातील व्यक्तींच्या मृत्यूच्या घटना या काळात संभवतात. या योगामुळे मोटे वाहन अपघात, विमा किंवा रेल्वे दुर्घटना संभवते. तसेच घरांची पडझड, शॉर्ट सर्किटमुळे होणाऱ्या आगीच्या दुर्घटना या काळात संभवते.

राजकीय क्षेत्रात मोठ्या घडामोडी या आठवड्यात संभवतात. मोठ्या पक्षात फूट पडेल. पक्षांतराच्या घटना वाढतील. एखाद्या राज्यातील सरकार अस्थिर होईल. मुख्यमंत्री (Chief Minister) , प्रमुख मंत्री यांच्यात बदल संभवतो. मोठ्या अधिकाऱ्यांचे निलंबन किंवा बदल्या या काळात संभवतात. मोठ्या व्यक्तींचे अपघात किंवा घातपात या काळात संभवतात.

प्रमुख शहरांमध्ये मोठे गुन्हे घडतील. पुणे, मुंबई, दिल्ली सारख्या प्रमुख शहरातील गुन्हेगारीमुळे दहशत निर्माण होईल. या काळात उष्णता वाढून मोठी पर्जन्यवृष्टी होईल. अचानक आलेल्या मोठ्या पावसामुळे मोठ्या शहरांतील जनजीवन विस्कळित होईल.

Bhavishyanama 12.jpeg
Vijaysinh Mohite Patil : शरद पवारांच्या राष्ट्रवादीतही विजयदादांना मानाचे पान...

या काळात शेअर मार्केटमध्ये मोठी तेजी अनुभवास येईल. रुपयाचे मूल्य वाढेल. सोन्या-चांदीचे भाव वाढतील. सप्तमातील शनीमुळे या काळात कोर्टाचे मोठे निर्णय गाजतील. पुढील काळात शनी-मंगळ योग होत आहे. यामुळे मोठे वाद-विवाद, युद्ध हाणामारी, आगीच्या दुर्घटना, स्फोटक घटना यातून अशांतता निर्माण होऊ शकते.

महाराष्ट्रात निवडणुकीच्या (Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर दोन गटांत मोठे वाद/हिंसा होण्याची शक्यता राहील. संप, बंद, आंदोलने यातून हिंसा होण्याची शक्यता राहील. निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे पोलिसांकडून मोठ्या कारवाया होतील. शनी-मंगळ कुयोगामुळे जागावाटपावरून युती-आघाडीमध्ये मतभेद वाढतील. मोठ्या पक्षांना बंडखोरीमुळे नुकसान संभवते. पक्षांतराच्या घटना मोठ्या प्रमाणावर होतील.

Bhavishyanama 12.jpeg
Navya Haridas Vs Priyanka Gandhi : भाजपने वायनाडमध्ये प्रियांका गांधींविरोधात नाव्या हरिदास यांना दिली उमेदवारी!

घटक पक्षांची भूमिका निर्णायक

आज आपण भारताच्या पत्रिकेचा विचार करू...

भारताची मकर रास असून 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र भारताचे नवीन पर्व सुरू झाले. या दिवशीचे ग्रहमान पाहून स्वतंत्र भारताची वाटचाल कशी असेल, याचा अंदाज घेता येईल. 15 ऑगस्ट 1947 रोजी कर्क राशीत अमावास्येच्या दिवशी स्वतंत्र भारताचे नवीन पर्व सुरू झाले. लोकशाहीच्या नवीन पर्वाची सुरुवात पाकिस्तान -चीन सारख्या शेजारील राष्ट्रांबरोबर युद्धासारख्या प्रसंगांनी झाली आहे.

सप्तमातील ग्रहांच्या गर्दीमुळे देशाच्या सीमा कायम तणावपूर्ण राहिल्या आहेत. भारताची मकर ही शनीच्या प्रभावाखालील रास असल्यामुळे शेती व उद्योगप्रधान, विकसनशील देश म्हणून ओळख राहिली आहे.

Horoscope .jpg
Horoscope .jpgSarkarnama

मकर रास ही संथ प्रगतीची व संघर्षाची रास असल्यामुळे देशाची प्रगती थोडी धीम्या गतीने होत असली, तरी मागील पाच वर्षांतील शनीचे स्वराशीतील भ्रमण भारताच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण राहिले आहे. २०१९ ते २०२४ या काळात देशाची ओळख अमेरिका, चीन नंतर तिसरी महासत्ता म्हणून झाली आहे. या काळात भारतीय उद्योगधंद्यांना मोठी चालना मिळाली असून देशातील पायाभूत सोयी-सुविधांमध्ये मोठी सुधारणा दिसून येत आहे. हा प्रगतीचा वेग २०४०पर्यंत वाढताना दिसून येईल.

दशमान तूळ राशीतील गुरूमुळे भारतीय राजकारणावर स्त्री वर्गाचा विशेष प्रभाव दिसून येतो. तसेच गुरूमुळे भाजपसारख्या हिंदुत्ववादी पक्षाकडे सत्ता चालून आली आहे. इंदिरा गांधी यांच्यानंतर नरेंद्र मोदी यांचा कार्यकाळ प्रभावी ठरला आहे. पुढील काळात योगी आदित्यनाथ किंवा एखाद्या अविवाहित नेत्याला पंतप्रधानपदाची संधी मिळू शकते.

Bhavishyanama 12.jpeg
Devendra Fadnavis Vs Congress: फडणवीसांच्या पराभवासाठी 'मविआ' मोठा डाव टाकणार; थेट 'लाडकी बहीण'च विरोधात उतरवणार?

सप्तमात अनेक ग्रहांची गर्दी असल्यामुळे अनेकविध जाती जमातींचा, धर्मांचा, जगातील प्रभावी लोकशाही देश म्हणून भारताची ओळख राहिली आहे. त्याचा प्रभाव म्हणून देशात व राज्यात युती किंवा आघाडी सरकारशिवाय पर्याय राहिला नाही. क्वचितच एखाद्या पक्षाला पूर्ण बहुमत मिळण्याची संधी मिळाली आहे.

हा ‘ट्रेंड’ यापुढेही कायम राहू शकतो. त्यामुळे भाजप व काँग्रेस दोन्ही प्रमुख पक्षांना यापुढेही मित्रपक्षांच्या मदतीशिवाय सत्ता स्थापन करणे शक्य होणार नाही. यामुळे काही प्रमाणात राजकीय अस्थिरता किंवा अपरिहार्यता सत्ताधारी पक्षाला सहन करावी लागणार आहे.

Maharashtra Politics Horoscope  (1).jpg
Maharashtra Politics Horoscope (1).jpgSarkarnama

नुकत्याच झालेल्या हरियानाच्या विधानसभा निवडणुकीप्रमाणे माध्यमांचे अंदाज महाराष्ट्रातसुद्धा चुकण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण कधी नव्हे एवढा गोंधळ महाराष्ट्राच्या राजकारणात 2019 पासून अनुभवास येत आहे. ज्योतिषशास्त्राच्या आधारे मतदान व निकाल यांच्या तारखांचा आधार घेऊन सत्ता कोणाकडे जाऊ शकते, याचा अंदाज आपण या पुढील लेखातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com