🔹 3-Point Summary:
कर्क राशीत अमावस्येचा प्रभाव: कर्क राशीत येणारी अमावस्या उत्तर भारतात नैसर्गिक आपत्ती (पूर, भूस्खलन), विमान अपघात, आणि भूकंपास कारणीभूत ठरू शकते.
राजकीय-आंतरराष्ट्रीय अस्थिरता: राजकीय क्षेत्रात पक्षफूट, सरकारविरोधी निदर्शने, आणि मोठ्या नेत्यांवरील कारवाई दिसून येतील. आंतरराष्ट्रीय पातळीवर युद्धसदृश स्थिती आणि आर्थिक अस्थिरता दिसून येईल.
सामाजिक-आर्थिक परिणाम: शेअर बाजारात घसरण, सोन्या-चांदीच्या किंमतीत घट, विद्यार्थ्यांवर विपरीत परिणाम, कलाकारांचे निधन, आणि शेतकरी व सरकारी कर्मचाऱ्यांचे आंदोलन दिसून येतील.
सिद्धेश्वर मारटकर
सप्ताहात कर्क राशीत अमावस्या होत आहे. मेष लग्नाच्या पत्रिकेत चतुर्थात होणारी अमावस्या उत्तर भारतान मोठी नैसर्गिक दुर्घटना घडविणारी राहील. दिल्ली, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या प्रदेशात पूर, अतिवृष्टी, भूस्खलन, दरड कोसळणे यांसारख्या दुर्घटनेतून मोठी हानी होण्याची शक्यता राहील. चतुर्थातील अमावस्या मोठ्या भूकंपासाठी प्रतिकूल राहील. मंगळाची अष्टम व द्वादश भावावर दृष्टी असल्याने याकाळात विमान दुर्घटना व मोठी हानी होण्याची शक्यता राहील. विमानसेवा विस्कळित होईल. खराब हवामानामुळे अनेक उड्डाणे रद्द होतील विमानात बॉम्ब असल्याच्या अफवा पसरविल्या जातील.
काही देशांत विमान अपहरणाचा प्रयत्न होईल. पुढील काळात मंगळ कन्या राशीत प्रवेश करीत आहे. त्यामुळे शेतकरी आंदोलने, सरकारी कर्मचाऱ्यांचे संप, बंद तीव्र होतील, हॉस्पिटल, बँक कर्मचारी, निवासी डॉक्टरांचे संप होतील. कन्या राशीतील मंगळामुळे गुन्हेगारीमध्ये वाढ झालेली दिसेल. दहशतवादी, नक्षलवादी सक्रिय होतील. हिंसा किंवा स्फोटक घटना घडविल्याचे प्रयत्न होतील. पुढील काळात सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता राहील, चोरीचे गुन्हे वाढतील. चोरीचे गुन्हे वाढतील. राजकीय व्यक्ती, उद्योगपती यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होतील. मोठ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई, तुरुंगवास होण्याची शक्यता राहील.
प्लुटोच्या प्रतियोगांत होणारी अमावस्या राजकीय क्षेत्रात मोठ्या घडामोडी घडविणारी असून, जुन्या पक्षात फूट पडेल. मोठ्या, ज्येष्ठ त्याच्या मृत्यूची घटना या काळात संभवते. या काळात सत्ताधारी पक्षातील विसंवाद वाढण्याची शक्यता असून, सरकार विरोधात विरोधकांकडून मोठी निदर्शने होतील. त शनी-मंगळ प्रतियोग होत असल्यामुळे काही राज्यांत बरखास्तीचे निर्णय होऊन निवडणुकांची घोषणा होईल. सत्तेतील पक्षांमध्ये, युती-आघाडीमध्ये फूट पडून एखादा पक्ष-युती आघाडीमधून बाहेर पडल्याची शक्यता राहील.
विरोधी आघाडीतील एखादा पक्ष आघाडीतून बाहेर पडेल.मोठ्या, महत्त्वाच्या देशात सत्तेविरोधात बंड होण्याची शक्यता राहील. अमेरिकेत ट्रम्प यांच्याविरुद्ध जनतेमध्ये रोष वाढल्याची शक्यता असून, एलॉन मस्क यांना वाढता पाठिंबा मिळेल. अमेरिकेच्या नव्या टेरिफ विरोधात इतर देशांचा सामूहिक विरोध होईल. जगातील प्रमुख उद्योगांवर याचा नकारात्मक परिणाम अनुभवास येईल. शनी-मंगळ कुयोगामुळे शेजारी राष्ट्रांत स्फोटक घटना, हिंसा किंवा युद्धासारखे प्रसंग अनुभवास येतील.
पाकिस्तान-बांगलादेशामध्ये अशांतता, स्फोटक घटना संभवतात. रशिया-युक्रेनमधील संघर्ष पुन्हा वाढण्याची शक्यता राहील.अमावस्येजवळ शेअर मार्केटमध्ये मोठी पडझड अनुभवास येईल. सोन्या-चांदीच्या भावात घसरण होईल. रुपयाचे मूल्य कमी होण्याची शक्यता राहील. खेळ-स्पर्धांमध्ये नाट्यमय निकाल लागतील.
खेळाडूंच्या दुखापती, अपघात किंवा वादविवाद यांसारख्या घटना संभवतात. अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागेल. भारत-इंग्लंड संघातील सामना अटीतटीचा होऊन नाट्यमय निकाल लागेल. कर्क राशीतील अमावस्या लहान मुले, विद्यार्थ्यांंसाठी प्रतिकूल राहील. लहान मुलांचे अपघात, अपहरण, विषबाधेसारख्या घटना संभवतात.
साहित्य संमलने यशस्वी होतील. लेखक, साहित्यिक, पत्रकार यांचे गौरव होतील. धार्मिक सण, उत्सव उत्साहात साजरे होतील. मोठ्या कलाकारांसाठी हा काळ प्रतिकूल असून, गायक, संगीतकार, चित्रपट कलावंतांच्या मृत्यूची घटना होण्याची शक्यता राहील. या काळात धार्मिक, सामाजिक क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तीचा मृत्यू, अपघात होण्याची शक्यता राहील.
मेष : चतुर्थात होणारी अमावस्या घर, जागा, प्रॉपर्टीची कामे करण्यासाठी अनुकूल राहील. कौटुंबिक समस्या सोडवाल. आर्थिक नियोजन होईल. भावंडे-नातेवाइकांचा सहवास लाभेल.
वृषभ : मोठी कामे धाडसाने पार पाडाल. छोटे प्रवास, सहली कराल. सप्ताहात मन उत्साही राहील. आरोग्य उत्तम राहील. आर्थिक स्थि्तीत सुधारणा होईल. मोठी गुंतवणूक होईल.
मिथुन : अमावस्या कौटुंबिक समस्या सोडविण्यासाठी उपयुक्त. आर्थिक समस्या सुटतील. दूरचे प्रवास होतील. मोठे खर्च होतील. परदेशगमनासाठी प्रयत्न होतील. तरुणांचे विवाह जमतील.
कर्क : सप्ताहात मोठी इच्छापूर्ती होईल. मोठे लाभ होतील. मित्र-मैत्रिणींचा सहवास लाभेल. उंची वस्तू, वस्त्र, अलंकार यांची प्राप्ती होईल. जुनी येणी वसूल होतील. मोठ्या प्रवासासाठी संधी मिळेल.
सिंह : नोकरीनिमित्त मोठे प्रवास,व्हिसा, पासपोर्टची कामे होतील. घर, वाहन खरेदीसाठी उत्तम काळ असून, मोठे कर्ज मंजूर होईल. मोठ्या व्यक्तींचा सहवास लाभेल. मनासारख्या घटना घडतील.
कन्या : मनासारखी कामे होतील. घर, जागा, वाहन यांचा लाभ होईल. नोकरीमध्ये प्रमोशन होईल. व्यवसायात मोठी वाढ होईल. सामाजिक, राजकीय क्षेत्रात मोठे पद, प्रतिष्ठा लाभेल. तीर्थयात्रा, दानधर्म कराल.
तूळ : नवीन नोकरीची संधी मिळेल. नोकरीत प्रमोशन होईल. व्यवसायात बदल होतील. बदलीसाठी प्रयल केल्यास यश मिळेल. सामाजिक, राजकीय क्षेत्रात मोठे पद मिळेल. कमी श्रमातून मोठा लाभ होईल.
वृश्चिक : विद्यार्थ्यांना मोठे यश मिळेल. धार्मिक, मंगल कार्य घडतील. तीर्थयात्रा होईल. सप्ताहात तरुणांचे विवाह जमतील. भागीदारीच्या व्यवसायात मोठा फायदा होईल. अचानक मोठे आर्थिक लाभ होतील.
धनू : प्रवास जपून करावेत. घर, जागेच्या कामात कटकटी संभवतात. हितशत्रूंपासून उपद्रव. भागीदारी व्यवसायात चांगला फायदा, वैवाहिक जीवनात आनंदी वातावरण राहील.
मकर : वैवाहिक जीवनात मनस्ताप संभवतो. जोडीदाराची काळजी घ्यावी. भागीदारीत कटकटी संभवतात. मुलांच्या समस्या मार्गी लागतील. शेअर्ससारख्या व्यवसायान लाभ होईल. नवीन नोकरीची संधी मिळेल.
कुंभ : शारीरिक-मानसिक स्वास्थ्य खराब राहील. नोकरीच्या ठिकाणी मनस्ताप संभवतो. नोकरी बदलण्याचे विचार येतील. मात्र, सप्ताहात घर, जागा, वाहन खरेदी यांसाठी योग्य काळ राहील. घरात पाहुण्यांची वर्दळ राहील.
मीन : विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी धावपळ करावी लागेल. शेअर मार्केटपासून दूर राहावे. प्रेमप्रकरणात मनस्ताप संभवतो. सप्ताहात छोटे प्रवास, सहली होतील. भावंडे, नातेवाइकांचा सहवास लाभेल. आनंदाची बातमी कळेल.
❓ 4 FAQs (with 1-line answers):
या आठवड्यात कोणत्या राशीत अमावस्या आहे?
→ कर्क राशीत अमावस्या आहे.
राजकीय क्षेत्रात काय घडू शकते?
→ पक्षफूट, निदर्शने आणि नेत्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.
वायुमार्गात काय अडथळे येतील?
→ विमान अपघात, बॉम्बच्या अफवा, आणि उड्डाणे रद्द होण्याची शक्यता आहे.
विद्यार्थ्यांवर या काळाचा काय परिणाम होईल?
→ अपघात, विषबाधा आणि मनस्तापासारखे विपरीत परिणाम होऊ शकतात.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.