Pune Lok sabha Election Sarkarnama
प्रशासन

Lok Sabha Election News : निवडणुकीच्या काळात 14 कोटींचे प्रलोभन साहित्य जप्त !

Chaitanya Machale

Pune News : लोकसभा निवडणूक प्रचाराच्या काळात मतदारांना वेगवेगळ्या माध्यमातून प्रलोभने दाखविणारा तब्बल 14 कोटी रुपयांचा मुद्देमाल जिल्हा निवडणूक कार्यालयाने (Election Commission) जप्त केला. सोने-चांदीचे दागिने, मद्य, रोख रक्कम तसेच अंमली पदार्थ आणि इतर वस्तूंचा समावेश आहे.

देशात लोकसभा निवडणुकांचे मतदान सुरू झाले आहे. महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदार संघासाठी (Lok Sabha Election) पाच टप्प्यात मतदान होत आहे. आतापर्यंत मतदानाचे तीन टप्पे पूर्ण झाले आहे. तर उद्या चौथ्या टप्प्यात पुणे जिल्ह्यातील पुणे शहर, शिरूर, मावळ लोकसभा मतदान संघासाठी मतदान होत आहे. (Lok Sabha Election News)

निवडणूक जाहीर झाल्यापासून जिल्हा प्रशासनाने मतदारांना प्रलोभने दाखविणाऱ्या वस्तू जप्त करण्यात आल्या. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागातून हा 13 कोटी 96 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानंतर जिल्हा निवडणूक प्रशासनाने प्रत्येक विधानसभा मतदारसंघात भरारी पथके नेमली, तपासणी पथकांची नियुक्ती केली होती. या पथकांनी आतापर्यंत 4 कोटी 34 लाख रुपयांची रोकड, 1 कोटी 69 लाख रुपयांचे सोने, चांदी आणि दागिने, 4 कोटी 09 लाख रुपयांचा दारूसाठा, 1 कोटी 14 लाख रुपयांचे अंमली पदार्थ आणि 2 कोटी 78 लाख रुपयांचे मतदारांना प्रलोभन दाखविण्यासाठी वाटप करण्यात येणारे साहित्य असा 14 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, राजकीय जाहिराती प्रमाणीकरण करणाऱ्या कक्षाकडून 100 पेक्षा जास्त जाहिरातींचे प्रमाणीकरण केले आहे. माध्यम कक्षाकडून 38 समाजमाध्यमातील खात्यांवर विनापरवानगी जाहिरात केल्याप्रकरणी कारवाई केली आहे.

SCROLL FOR NEXT