Governor Ramesh Bais Sarkarnama
प्रशासन

Agricultural University : कृषी विद्यापीठाने राज्यपालांना केले सेन्सॉर; काय आहे प्रकरण?

Governor Ramesh Bais upset :राज्यपालांनी कृषी विद्यापीठाचे काढले वाभाडे

Sachin Deshpande

Dr.PDKV Akola : डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या टिपिकल काॅन्व्होकेशन सोहळ्याला कंटाळून राज्यपाल रमेश बैस यांनी थेट स्वागत गीत गात असलेल्या युवतींनीच पीएच डी द्यावी, असे वैतागून सांगितले. अकोल्यातील डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ढिसाळ नियोजनाचे लाईव्ह कार्यक्रमात राज्यपालांनी वाभाडे काढले. त्यामुळे कृषी विद्यापीठाने 38 वा दीक्षांत सोहळ्याचे सर्व लाईव्ह फुटेज विद्यापीठाने त्वरीत डिलिट करत एक प्रकारे राज्यपाल रमेश बैस यांच्यावर सेन्सारशीप लावल्याचे चित्र आहे. या प्रकरणात कृषी विद्यापीठाचे पीआरओ किशोर बिडवे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी कुठलाही प्रतिसाद 'सरकारनामा'ला दिला नाही.

अकोल्यातील डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा आज 38 वा दीक्षांत समारंभ होता. या दीक्षांत सोहळ्यात चार हजार विद्यार्थ्यांना स्नातक, स्नातकोत्तर आणि आचार्य अशा विविध पदव्या देण्यात आल्या. या सोहळ्यात राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस अध्यक्षस्थानी होते. मुंबईत स्थित राजभवनातून राज्यपाल ऑनलाईन या सोहळ्यात जोडल्या गेले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अतिशय टिपिकल आणि लांबलचक कार्यक्रमामुळे राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais) चांगलेच वैतागले. विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्याचा एक पॅटर्न ठरला असून त्या परंपरागत साच्यातून कृषी विद्यापीठ आणि सरकारी यंत्रणा बाहेर यायला तयार नाही. त्यामुळे राज्यपाल रमेश बैस यांनी लाईव्ह कार्यक्रमातच कृषी विद्यापीठ प्रशासनाचे वाभाडे काढले. इतक्यावर राज्यपाल थांबले नाही, तर त्यांनी गीत गायन करणाऱ्यां युवतीने पीएच.डी. पदव्या पद्रान कराव्यात, अशी सुचना वैतागून केली. विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्याचे हे थेट प्रसारण विद्यापीठाच्या यु ट्युब चॅनलवरुन करण्यात आले. पण, कृषी विद्यापीठाचे वाभाडे राज्यपालांनी काढल्याने विद्यापीठाने संपुर्ण व्हिडीओ आणि यु ट्युबवरील काॅन्व्होकेशनचा लाईव्ह सोहळाच डिलिट केला. त्यामुळे चार हजार विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक जीवनातील अमुल्य क्षणांचा व्हिडीओ डिलिट झाल्यामुळे पाहता आला नाही. हा सर्व प्रकार विद्यापीठाच्या ढिसाळ आणि वेळकाढू धोरणामुळे झाल्याची चर्चा सर्वत्र होती.

विद्यापीठाच्या या सोहळ्यावर दरवर्षी विद्यापीठ लाखो रुपये खर्च करते. आज राज्यपालांनी कृषी विद्यापीठ प्रशासनाला छोटासा कार्यक्रम घेण्याची गरज अधोरेखित केली. इतक्यावरच राज्यपाल थांबले नाही तर त्यांनी ढिसाळ नियोजनाबद्दल विद्यापीठ प्रशासनावर ताशेरे ओढले. या सोहळ्याचे लाईव्ह प्रसारण अचानक डिलिट झाल्याने विद्यापीठाने आज थेट राज्यपाल तसेच कृषी विद्यापीठाचे कुलपती यांनाच सेन्सार करत स्वतःच चूक झाकण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार गंभीर असून भविष्यात कृषी विद्यापीठाचा सोहळा टिपिकल तीन ते चार तासांचा न राहता तो मोजकाच असेल, अशीच काय ती अपेक्षा कृषी विद्यापीठातील प्राध्यापक तसेच विद्यार्थी करत आहेत. त्याच बरोबर विद्यापीठ प्रशासनाने त्वरीत संपुर्ण कार्यक्रमाचा सोहळा यु ट्युबवर शेअर करण्याची गरज विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT