Manoj Jarange Patil Hunger Strike : मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; एकनाथ शिंदेंना अल्टिमेटम!

Maratha Reservation Protest News : मनोज जरांगे यांना पाठींबा देण्यासाठी शिवतीर्थ येथे सकल मराठा समाजातर्फे उपोषण सुरू करण्यात आले.
Maratha Quota Hunger Strike
Maratha Quota Hunger StrikeSarkarnama
Published on
Updated on

Maratha Aarakshan : मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे-पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. त्यांनी अन्न, पाणी घेण्यास नकार दिला असून त्यांची प्रकृती खालावली आहे. त्याचे तीव्र पडसाद नाशिक शहरात उमटले. सकल मराठा समाजाने आंदोलन सुरू करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक दिवसाचे अल्टिमेटम दिले आहे. (Manoj Jarange Patil Hunger Strike)

Maratha Quota Hunger Strike
Medha Kulkarni News : ...अखेर मेधा कुलकर्णींनी करुन दाखवलंच; माजी आमदार ते थेट खासदार!

मनोज जरांगे (Manoj Jarange ) यांना पाठींबा देण्यासाठी शिवतीर्थ येथे सकल मराठा समाजातर्फे उपोषण सुरू करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विषयी अतिशय संतप्त भावना व्यक्त केल्या.

जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात वाशी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आरक्षणाबाबत आश्वासन दिले होते. मुख्यमंत्र्यांनी किमान आपल्या शब्दाची स्वतः तरी किंमत करावी आणि दिलेले आश्वासन पाळावे, असे आवाहन आंदोलकांनी केले.

उद्यापर्यंत अंतिम आदेश काढून आरक्षण न दिल्यास त्याचे तीव्र परिणाम राज्य सरकारला भोगावे लागतील, असा इशारा यावेळी नाना बच्छाव यांनी दिला. जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत असतानाही शासकीय यंत्रणा अतिशय सुस्तपणे काम करीत आहे.

यात सरकारचे काही कारस्थान तर नाही ना असा संशय येतो. राज्य सरकारने काही वाकडे पाऊल उचलले तर त्याचे परिणाम भोगण्यास राज्य शासनाने तयार राहावे, असा इशारा यावेळी देण्यात आला.

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची प्रकृती खालवत असल्याने राज्यभरातील मराठा समाज बांधव जालना येथे जमू लागले आहेत. त्यांच्या केसाला जरी धक्का लागला तर महाराष्ट्राची परिस्थिती बिघडवायला मराठा समाज आता मागे पुढे पाहणार नाही.

त्यामुळे आजच्या आजच मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊन आरक्षण जाहीर करावे आणि मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण थांबवावे. अन्यथा समाजाच्या रोषास बळी पडावे लागेल याची जाणीव मुख्यमंत्र्यांनी ठेवावी, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

यावेळी सकल मराठा समाजाचे राज्य समन्वयक चंद्रकांत बनकर, शिवसेनेचे उपनेते सुनील बागुल, सचिन पवार, करण गायकर, नाना बच्छाव, नितीन रोटे पाटील, ज्ञानेश्वर कवडे, योगेश नाटकर, राजेंद्र शेळके, विकी गायधनी, वैभव दळवी, संदीप पडोळ, भारत पिंगळे, चेतन शेलार यांसह शेकडो पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत शासनाचा निषेध केला.

(Edited By Roshan More)

Maratha Quota Hunger Strike
Prakash Ambedkar Latest News : मोदी, शहांवर घसरणाऱ्या आंबेडकरांनी आता राणेंनाही सोडले नाही !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com