Pune District Central Co-operative Bank: Financial Overview : उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने रेकॉर्डब्रेक कामगिरी केली आहे. बँकेच्या २०२५ या वर्षातील आर्थिक स्थितीचा आढावा विषयी माहिती बँकेचे चेअरमन डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी दिली. यावेळी व्हा चेअरमन सुनील चांदेरे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुध्द देसाई, संचालक संभाजी होळकर, पूजा बुट्टे पाटील, निर्मला जागडे, प्रवीण शिंदे आदी उपस्थित होते.
बँकेचे चेअरमन डॉ. दिगंबर दुर्गाडे म्हणाले की, देशातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये प्रथम क्रमांकाची व्यवसायिक उलाढाल असणारी व पहिल्या पाच क्रमांकामध्ये असणाऱ्या अर्बन शेडयूल्ड सहकारी बँकांशी तुलना करता पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने अग्रगण्य स्थान प्राप्त केलेले आहे. तर बँकेने सन २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये खरीप व रब्बी हंगामासाठी एकूण ३.१२,६३९ सभासदांना २९९१ हजार ८३ लाख रूपयांचे कर्ज वितरीत केले असून सदर कर्जाचे १०९ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. बँकेने शेती व शेतीपुरक व्यवसायासाठी सन २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये १००५१ सभासदांना ४०७ कोटी १४ लाख रूपयांचे मध्यम मुदत कर्ज वितरीत केले आहे. तर मार्च २०२५ अखेर बँकेचा ढोबळ एन.पी.ए. २.६० टक्के असून बँकेचा नेट एन.पी.ए. शून्य टक्के आहे.
पुणे जिल्हा सहकारी बँकेने सन २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये ठेवी, कर्ज, व्यवसायिक उलाढाल, वसुली, स्वनिधी, नफा, नेटवर्थ, ठेवी, कर्जे, एन.पी.ए. वसुली प्रोव्हिजन कव्हरेज रेशो या सर्व पातळीवर ऐतिहासिक कामगिरी केलेली आहे. बँकेची गत वर्षाच्या तुलनेत व्यवसायामध्ये ३०७३ हजार कोटी ६६ लाख रूपयांची भरीव वाढ होऊन २६ हजार ८२६ कोटी रूपयांची व्यावसायिक उलाढाल झाली आहे. बँकेस तरतूद पुर्व नफा ४३९ कोटी ६१ लाख रूपये व निव्वळ नफा ७५ कोटी ७५ लाख रूपयांचा झाला आहे, अशी माहिती बँकेचे चेअरमन डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी दिली.
पीक कर्जाची फक्त मुद्दल रक्कम आदा करून संस्था पातळीवरील सन २०२४-२५ च्या पीक कर्जाची वसुली करणे संदर्भात बँकेने कार्यवाही केली आहे. ज्या सभासदांनी व्याज रक्कम भरून पीक कर्जाची परतफेड केली आहे त्यांची व्याजाची रक्कम बँकेमार्फत आदा करण्याचा निर्णयही बँकेच्या संचालक मंडळाने घेतला आहे. तसेच सहकारी संस्थांना आर्थिक नुकसान होवू नये म्हणून संस्थांनी शासन येणे दर्शविलेले व्याजाची रक्कम ९३ कोटी २० कोटी देखील बँकेमार्फत सहकारी संस्थांना आदा करण्यात आली आहे.
`` गेल्या अनेक वर्षापासून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बॅकेची वाटचाल चांगली सुरू आहे. त्यामुळे दरवर्षी बॅक नफ्यात येत आहे. त्यासाठी सर्व कर्मचारी, अधिकारी व संचालक मंडळ चांगल्या पद्धतीने प्रयत्न करत असून विविध नवनवीन संकल्पना राबविल्या जात आहे. त्याचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे. अशी प्रतिक्रियाही डॉ. दिगंबर दुर्गाडे, चेअरमन, पीडीसीसी बॅक, पुणे यांनी दिली.
बँकेला बॅकिग फ्रॅटायर्स या संस्थेमार्फत सन २०२३-२४ या वर्षाकरीता उत्कृष्ट कामकाजाबद्दल पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस "उत्कृष्ट सहकारी बॅंक" या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. बँकेस सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात केलेल्या उत्कृष्ट कामकाजा बद्दल बेस्ट इनोवोटिव्ह बॅक आँफ द इयर, बेस् बॅक आँफ द इयर, बेस्ट कस्टमर एक्सपिईन्स एक्सलन्स अवार्ड या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.