ST employees strike  Sarkarnama
प्रशासन

ST Employee News : सरकारची डोकेदुखी वाढणार, एसटी कर्मचारी जाणार संपावर !

Assembly session 2024 : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन गुरुवारपासून सुरु झाले आहे. आमच्या प्रलंबित मागण्या मान्य न केल्यास अधिवेशनाच्या काळातच आंदोलन करण्याचा इशारा एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारला दिला

Chaitanya Machale

Mumbai News : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावे, या मागणीसाठी एस.टी कर्मचारी आंदोलन करणार आहेत. येत्या येत्या 9 आणि 10 जुलै रोजी मुंबईतील आझाद मैदानावर एसटी कर्मचाऱ्यांकडून हा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. एस.टी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केल्यास त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसणार आहे.

प्रलंबित महागाई भत्त्याची देखील मागणी एस.टी कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे. एस.टी महामंडळ हा राज्य सरकारचा एक भाग असून या कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचारी यांच्याप्रमाणे सुविधा तसेच वेतन द्यावे, अशी मागणी केली जात आहे. यापूर्वीही एस.टी. कर्मचारी संघटनेकडून याबाबत मागणी करण्यात आली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्याचे धोरण राज्य सरकारडून (State Goverment ) घेतले जात आहे. या पार्श्वभूमीवर या पावसाळी अधिवेशना दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन करण्याचा राज्य सरकारला इशारा दिला आहे.

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन (Assembly session) गुरुवारपासून सुरु झाले आहे. आमच्या प्रलंबित मागण्या मान्य न केल्यास अधिवेशाच्या काळातच आंदोलन करण्याचा इशारा एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारला दिला आहे. एसटी च्या सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना इनडोअर आणि आऊटडोअर मेडिकल कॅशलेश योजना लागू करावी, एसटीचे खासगीकरण बंद करावे, वेळापत्रकातील त्रुटी दूर कराव्यात, अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन केले जाणार आहे. राज्य सरकारने याबाबत सकारात्मक निर्णय न घेतल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशाराही कर्मचाऱ्यांनी दिला आहे.

महाराष्ट्र एसटी कामगार सेना, महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस इंटक, एसटी कामगार संघटना, राष्ट्रीय एसटी कामगार काँग्रेस या संघटनांची बैठक नुकतीच पार पडली. त्यामध्ये विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत एकमताने ठराव करण्यात आले. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कामगारांना देखील सोयीसुविधा मिळाव्यात, यासाठी लढा देण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. त्यानुसार येत्या 9 आणि 10 जुलै रोजी मुंबईतील आझाद मैदानावर एसटी कर्मचाऱ्यांकडून हा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT