Maharashtra Sadan News : काश्मीरमध्ये उभारणार लवकरच 'महाराष्ट्र' सदन; राज्य सरकारने खरेदी केली जमीन

Ravindra Chavan News : राज्य सरकारच्या वतीने काश्मीरमध्ये महाराष्ट्र सदन उभारण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली.
Maharashtra sadan
Maharashtra sadansarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो पर्यटक निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी काश्मीरला जातात. त्यामुळेच महाराष्ट्र सरकारने काश्मीरला भेट देणाऱ्या मराठी माणसांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या वतीने काश्मीरमध्ये महाराष्ट्र सदन उभारण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली.

महाराष्ट्र सरकारच्यावतीने लवकरच बडगाम येथे बांधण्यात येणाऱ्या महाराष्ट्र सदनासाठी आवश्यक असलेल्या 2.50 एकर जमिनीसाठी महाराष्ट्र सरकारने 9 कोटी 30 लाख 24 हजार रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे, असे मंत्री चव्हाण (Ravindara chavan) यांनी सांगितले. केंद्र सरकारने येथील कलम 370 हटवल्यामुळे काश्मीरमध्ये आता कोणीही भारतीय नागरिक जमीन खरेदी करु शकणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र सदन उभारणीसाठी जमीन खरेदी केली आहे. (Maharashtra Sadan News)

महाराष्ट्र व जम्मू-काश्मीर सरकार यांच्यावतीने जमीन खरेदीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. महाराष्ट्र सदन उभारण्याच्यादृष्टीने दोन्ही राज्यात आवश्यक प्रक्रिया करण्याच्यादृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.

येत्या काळात काश्मीरमध्ये जमीन खरेदी करण्यासाठी विभागाच्या वतीने 9 कोटी 30 लाख 24 हजार रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी ही माहिती दिली. जम्मू काश्मीरमधील महाराष्ट्र सदन उभारणीसंदर्भात मंत्री चव्हाण यांनी सांगितले की, जम्मू आणि काश्मीर सरकारने बडगाम जिल्हयातील इच्चगाम तालुक्यातील 2.50 एकर (20 कँनल) जमीन महाराष्ट्र सरकारला प्रदान केली आहे.

नियोजन व आराखड्याची प्रक्रिया सुरु

या भूखंडावरील जागेवरील महाराष्ट्र सदन (Mahrashtra Sadan) कश्या स्वरुपाचे असावे व त्यामध्ये कोणत्या सोयी-सुविधा असतील याच्या नियोजन व आराखड्याची प्रक्रिया सुरु आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष महाराष्ट्र सदन उभारणीच्या कामाला सुरुवात होईल व लवकरच काश्मीरमध्ये महाराष्ट्र सदन उभे राहिल, असा विश्वास मंत्री चव्हाण यांनी व्यक्त केला.

Maharashtra sadan
Sangola MVA vs Mahayuti News : सांगोला विधानसभेसाठी महायुतीमध्ये 'आबा' की 'बापू'; शेकापमध्ये दोन बंधूमध्येच रस्सीखेच

कलम 370 हटवल्यामुळे केली जमीन खरेदी

भारताचा जम्मू आणि काश्मीर हा एक केंद्रशासित प्रदेश आहे. हा 2019 पर्यंत भारताचे एक राज्य होता. भारतीय संसदेने मंजूर केलेल्या ठरावानुसार 31 ऑक्टोबर 2019 पासून जम्मू आणि काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश बनला आहे.

केंद्र सरकारने येथील कलम 370 हटवल्यामुळे काश्मीरमध्ये आता कोणीही भारतीय नागरिक जमीन खरेदी करु शकणार आहे. त्यानुसार, महाराष्ट्र सरकारनेही महाराष्ट्र सदन उभारणीसाठी जमीन खरेदी केली आहे.

Maharashtra sadan
MVA Seat Sharing Update : कोण मोठा भाऊ नाही, कोण छोटा! विधानसभेसाठी 'असा' असणार 'मविआ' चा जागावाटप फॉर्म्युला?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com