opium poppy  Sarkarnama
प्रशासन

Buldhana Crime : अबब! 12 कोटीची 'अफू'ची रोपं; दोन-चार असतील, असे वाटणाऱ्या पोलिसांना सापडलं घबाड

Buldhana Police Force LCB police opium poppy twelve crore andhera Police Station : बुलढाणा जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी अफूविरोधात राज्यातील सर्वात मोठी कारवाई केली.

Pradeep Pendhare

Mumbai News : बुलढाणा पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने अंढारे पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मोठी कारवाई केली. बेकायदेशीरपद्धतीने करण्यात आलेल्या अफूच्या शेतीवर छापा घातला.

पोलिसांनी कारवाई तब्बल 12 कोटी 61 लाखांची रोपे जप्त केली. राज्यातील ही आजवरची सर्वात मोठी कारवाई आहे. संतोष मधुकर सानप (वय 49, रा. अंढेरा, बुलढाणा) याच्याविरोधात गुन्हा नोंदवत अटक करण्यात आली आहे.

शेतकरी (Farmer) संतोष सानप याने ही अफूची रोपं शेताच्या मधोमध लावली होती. कोणालाही संशय येणार नाही, अशी त्याने तजवीज केली होती. तशी तो देखील खबरदारी घेत होता. खबऱ्याला याची माहिती मिळताच, त्याने बुलढाणा पोलिसांना खबर दिली. आलेल्या माहितीची तपासणी केली. त्यात तथ्य आढळले.

स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी (Police) संतोष सानप याच्या शेतीत 21 फेब्रुवारीच्या रात्री पाहणी केली. पोलिसांना सुरवातील वाटले की, थोडीच रोप असतील. पण, त्यांच्या हाती घबाट लागले. संतोष सानप याने तब्बल 16 गुंठे जमिनीत अफूची रोपांच्या लागवड केली होती. ते पाहून पोलिसांचे देखील डोके चक्रावले.

पोलिसांची अधिक कुमक बोलावून घेत, ही रोप जप्त केली. रात्र असताना कारवाईला अडथळा येत होता. त्यासाठी पोलिसांनी जनरेटर उपलब्ध करून घेत, शेत परिसरात लाईटची व्यवस्था केली. रोपांचे वजन मोजण्यासाठी एक काटा आणला. काल रात्री साडेअकरा वाजता सुरू झालेली कारवाई आज सकाळी आठवाजेपर्यंत सुरू राहिली.

पोलिसांनी तब्बल 15 क्विंटल 72 किलो (1 हजार 572 किलो) वजनाची अफूची रोप जप्त केली. यात नारकोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस (एनडीपीएस) कायद्यातील तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक लांडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT