SSC Exam Paper Leak : दादा भुसे 'अ‍ॅक्शन मोड'वर, पेपर फोडणाऱ्यांवर उगरला कायद्याचा दंडुका; गुन्हा दाखल, शिक्षण विभागात खळबळ

Education Minister Dada Bhuse police registered case 10th class Marathi paper leak Badnapur Jalna : शिक्षण मंत्री दादा भसे यांनी मराठी पेपर फुटीप्रकरण गांभीर्याने घेतल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Dada Bhuse 1
Dada Bhuse 1Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : दहावी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी मराठी विषयाचा पेपर फुटीवर शिक्षण मंत्री दादा भुसे शिक्षण विभागाच्या कारभारावर चांगलेच संतापलेत.

पेपर फुटीप्रकरणी अ‍ॅक्शन घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्यानंतर स्थानिक पातळीवर गुन्हा दाखल करण्यात आला. जालना इथल्या बदनापूर परीक्षा केंद्रावर मराठी पेपरफुटी प्रकरणात शिक्षणाधिकारी मंगल धुपे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जालन्यातील बदनापूर इथल्या दहावीच्या परीक्षा केंद्रावर मराठी विषयाच्या पेपरफुटी प्रकरणी मल्टीसर्व्हिसेस चालककासह एका अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. शिक्षणाधिकारी मंगल धुपे यांनी फिर्याद दिली आहे. मराठी विषयच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची उत्तरे व्हाट्सअपवर प्रसारित केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Dada Bhuse 1
SSC Exam : कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा पाहून शिक्षणमंत्री भुसे संतापले; म्हणाले, 'आता थेट...'

बदनापूर परीक्षा केंद्रावर मराठी विषयाचा पेपर फुटलाच नाही, असा काही प्रकार झालाच नाही, अशी भूमिका प्रशासनाने घेतली होती. पण पेपरफुटीचा प्रकार पुरविण्यानिशी समोर आल्यावर शिक्षण विभागात चांगलाच गोंधळ उडाला. शिक्षण मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी देखील राज्यातील काॅपीमुक्त अभियान आणि मराठी विषयाच्या पेपर फुटीवर संताप व्यक्त केला.

Dada Bhuse 1
Kash Patel : तगडी 'FBI' यंत्रणा; नेतृत्व करणार भारतीय-अमेरिकन चेहरा

मराठी विषयाच्या पेपर फुटीची माहिती पुराव्यानिशी माहिती समोर आल्यावर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. यात मल्टीसर्व्हिसेस चालकासह आणखी एका जणाविरोधात बदनापूर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या मल्टीसर्विसेस चालकाला प्रश्नपत्रिका कुणी पुरवली याचा शोध घेतला जात आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सुरवातीला जालना इथल्या बदनापूर परीक्षा केंद्रावर पेपर फुटला नसल्याची भूमिका घेतली होती. मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी तसे स्पष्टीकरण दिले होते. परंतु आता शिक्षण विभागानेच गुन्हा दाखल केल्याने शिक्षण मंडळाच्या समन्वयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत.

बदनापूर इथं मराठी विषयाच्या समाज माध्यमांवर फिरणाऱ्या प्रश्नपत्रिका, मूळ नसून ती अन्य खासगी प्रकासकाने प्रकाशित केलेली असल्याचा दावा शिक्षण विभागाकडून केला जात होता. पण आता गुन्हा दाखल झाल्याने हे प्रकरण वेगळेच आहे, आणि कोणाला तरी वाचवले जात असल्याची चर्चा शिक्षण विभागात सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com