PM Narendra Modi Sarkarnama
प्रशासन

Modi Government Scheme : मोदी सरकारची नवी पेन्शन स्कीम; नोकरीची अट नाही, कुणाला मिळणार फायदा?

Universal pension scheme Employee News : नव्या पेन्शन योजनेमध्ये सहभागी होणे, बंधनकारक असणार नाही.

Rajanand More

New Delhi News : केंद्र सरकारकडून यूनिव्हर्सल पेन्शन योजनेवर काम सुरू करण्यात आल्याचे समजते. ही योजना ऐच्छिक आणि अंशदायी आहे. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे नोकरी नसलेल्यांनाही यामध्येही सहभागी होता येणार आहे. म्हणजेच असंघटित कामगारांना याचा फायदा मिळू शकतो. त्यामुळे देशभरातील बहुतेकांना या योजनेत सामावून घेण्याचा विचार सरकार करत आहे.  

केंद्र सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाकडून ही योजना तयार केली जात असल्याचे वृत्त ‘एनडीटीव्ही’ने दिले आहे. सामाजिक सुरक्षेचा विस्तार करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश असणार आहे. केंद्राच्या सध्याच्या पेन्शन योजना एकत्रित करून ही नवी योजना आणण्यावर विचार सुर असल्याचे वृत्तात म्हटले आहे.

यूनिव्हर्सल पेन्शन स्कीम ही कर्मचारी भविष्य निधी संघटनेअंतर्गत EPFO ही योजना तयार केली जात आहे. अंतिम मसूदा तयार झाल्यानंतर सर्व संबंधित घटकांकडून त्यावर सूचना मागवल्या जातील, असे नियोजन आहे. ही योजना ऐच्छिक असणार आहे. म्हणजे कोणीही या योजनेत सहभागी होऊ शकते. एखाद्याला नोकरी नसेल तरीही त्यांना फायदा मिळू शकतो.

कोणाला मिळणार फायदा?

यूनिव्हर्सल पेन्शन स्कीम ही योजना प्रामुख्याने असंघटित क्षेत्रातील मजूर, छोटे, व्यापारी, स्वयंरोजगार करणारे आणि इतर नागरिकांसाठी तयार केली जात आहे. यामध्ये 18 वर्षापेक्षा अधिक वय असलेले लोक सहभागी होऊ शकतो. या लाभार्थ्यांना वयाची साठी ओलांडल्यानंतर पेन्शन मिळू शकते.

नव्या योजनेत पतप्रधान श्रम योगी मानधन आणि राष्ट्रीय पेन्शन योजना अशा सध्या सुरू असलेल्या योजना एकत्रित केल्या जाऊ शकतात. या योजनांमध्ये निवृत्तीनंतर दरमहा तीन हजार रुपये पेन्शन मिळते. त्यामध्ये 55 रुपयांपासून 200 रुपयांपर्यंत लाभार्थ्यांचे पैसे जमा होतात. सरकारही त्यामध्ये तेवढेच योगदान देते. अटल पेन्शन योजनाही याअंतर्गत आणण्याबाबत विचारविनिमय सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT