
New Delhi News : दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर आम आदमी पक्षात अनेक मोठ्या घडामोडी घडू लागल्या आहेत. दिल्लीतील सत्ता गेल्यानंतर आपला मोठा धक्का बसला. पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांचा पराभव पक्षाच्या अजूनही पचनी पडलेला नाही. केजरीवाल पहिल्यांदाच विधानसभेच्या बाहेर आहेत. पण त्यानंतर आता त्यांना संसदेत पाठवण्यासाठी पक्षाने हालचाली सुरू केल्याची चर्चा आहे.
आपने बुधवारी केलेल्या एका घोषणेनंतर चर्चांना उधाण आले आहे. पक्षाचे राज्यसभेचे खासदार संजीव अरोरा यांना विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर केजरीवाल संसदेत जाणार असल्याचा चर्चांना उधाण आले आहे. निवडणूक लढण्यासाठी अरोरा खासदारकीचा राजीनामा देऊ शकतात.
पंजाबमधील लुधियाना पश्चिम विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. आपचे आमदार गुरप्रीत गोगी यांचे मागील महिन्यात निधन झाल्याने ही जागा रिक्त झाली आहे. त्यासाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीत अरोरा हे आपचे उमेदवार असतील. उद्योजक असलेले अरोरा पंजाबमधून 2022 मध्ये राज्यसभेत निवडून गेले होते.
अरोरा यांचा कालावधी 2028 पर्यंत आहे. मात्र, पोटनिवडणुकीत विजयी झाल्यास अरोरा यांना खासदारकीचा राजीनामा द्यावा लागेल. एकाचवेळी ते संसदेत आणि विधीमंडळात राहू शकत नाहीत. त्यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर केजरीवाल यांना उमेदवारी दिली जाऊ शकते, अशी चर्चा आहे. आपकडून मात्र या चर्चा फेटाळण्यात आल्या आहेत.
अरोरा यांना मंत्रिपदाचेही आश्वासन दिल्याची चर्चा आहे. निवडणूकीत ते निवडून आल्यानंतर त्यांचा भगवंत मान यांच्या मंत्रिमंडळात समावेश केला जाऊ शकतो. पक्षाचे सुप्रिमो केजरीवाल यांना जागा रिकामी करून दिल्याचे बक्षीस अरोरा यांना दिले जाईल, असे सांगितले जात आहे. दिल्लीत विधान परिषद नसल्याने केजरीवालांना मागील दरवाजाने विधीमंडळात जाता येणार नाही. त्यामुळे ते संसदेत जाऊ शकतात, असे राजकीय जाणकार सांगू लागले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.