Devendra Fadnavis, PMRDA Sarkarnama
प्रशासन

Pune : पीएमआरडीएचा विकास आराखडा रद्द, सोयीने 'प्लॅन' तयार केलेल्या राजकारण्यांना CM फडणवीसांचा दणका

Devendra Fadnavis : पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात PMRDA चा विकास आराखडा रद्द करण्याच्या सूचना मुख्यमंत्री तथा प्राधिकरणाचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (2 एप्रिल) दिल्या आहेत.

Hrishikesh Nalagune

Pune News : पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात PMRDA चा विकास आराखडा रद्द करण्याच्या सूचना मुख्यमंत्री तथा प्राधिकरणाचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (2 एप्रिल) दिल्या आहेत. पायाभूत सुविधांचा अभाव आणि सोयीने प्लॅन तयार केल्याच्या तक्रारी राज्य सरकारकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. आता आधी पायाभूत सुविधा तयार करायच्या आणि त्यानंतर नागरी वसाहतींचे नियोजन करण्यात येणार आहे.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने हा विकास आराखडा तयार केला होता. मात्र अरुंद रस्ते, सांडपाण्याचे अयोग्य व्यवस्थापन अशा परिस्थितीत नव्या वसाहती वसवणारा विकास आराखडा प्रत्यक्षात आणणे अयोग्य असल्याचे मत मुख्यमंत्री फडणवीस आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे झाल्याने त्यांनी संयुक्तरित्या हा निर्णय घेतल्याचे समजते. मात्र पुण्याचे पालकमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार बीड येथे असताना आज मुंबईत हा निर्णय घेण्यात आला आहे.

या विकास आराखड्याबाबत नागरिकांच्याही तक्रारी राज्य सरकारकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यावर न्यायालयात दावेही दाखल करण्यात आले होते. विकास आराखड्यात मनासारखा झोन, आरक्षण, रस्ते टाकून अनैसर्गिक बदल करण्यात आल्याचे आणि त्यासाठी आर्थिक व्यवहार झाल्याच्या नागरिकांच्या तक्रारी होत्या. त्यानुसार आराखडा रद्द करण्यात आला आहे. आता विकास आराखडा प्रक्रिया सुरू झाली असताना ती मध्येच रोखल्याने न्यायालयाला यासंबंधातील माहिती दिली जाणार आहे.

काय होते या आराखड्यात?

  • पुणे जिल्ह्यातील तब्बल 814 गावांचा म्हणजे सुमारे 60 टक्के भागाचा समावेश होता.

  • 18 अर्बन ग्रोथ सेंटरच्या माध्यमातून 233 गावांच्या विकासाचे मॉडेल प्रस्तावित करण्यात आले होते.

  • या मॉडेलच्या माध्यमातून 1 हजार 638 चौरस किलोमीटर क्षेत्राचा विकास करण्यात येणार होता.

  • उर्वरित ग्रामीण भागांसाठी आठ ग्रोथ सेंटरच्या माध्यमातून विकासाचे नियोजन होते.

  • एका ग्रोथ सेंटरमध्ये किमान 5 ते 24 गावांचा समावेश होता.

  • एल अॅण्ड टी कंपनीमार्फत तयार करून घेतलेल्या 'सर्वकष वाहतूक आराखड्या'चाही समावेश होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT