Maharashtra IAS officer transfer .jpg Sarkarnama
प्रशासन

IAS Transfer Order : मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांचा प्रशासनला 'दे धक्का', एकाच वेळी 20 अधिकाऱ्यांची बदली!

Maharashtra Govt Transfers 20 IAS Officers : पीएमपीएमएलच्या अध्यक्षा IAS दीपा मुधोळ-मुंडे यांची पुण्यात समाज कल्याण आयुक्त म्हणून बदली करण्यात आळी आहे.

Roshan More

IAS Transfer Order: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेची सुत्र हाती घेतल्यानंतर प्रशासना मोठे बदल गेले आहेत. त्यांनी IAS आणि IPS अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या धडाकाच लावला आहे. पावसाळी अधिवेशन संपण्याच्या पूर्वसंध्येला तब्बल 20 अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. या पूर्वी जून महिन्यात चार IAS अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली होती.

सरकारने केलेल्या बदल्यांमध्ये वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तर, काही अधिकाऱ्यांना IAS पदोन्नती देत त्यांची बदली करण्याता आली आहे. वसई विरार महापालिकेचे आयुक्त म्हणून IAS एम.एम.सूर्यवंशी यांची बदली करण्यात आली आहे. या पूर्वी ते व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ येथे कार्यरत होते. तर, वसई-विरार महापालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार यांची झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, ठाणे (MMRSRA) येथे बदली करण्यात आली आहे.

पीएमपीएमएलच्या अध्यक्षा IAS दीपा मुधोळ-मुंडे यांची पुण्यात समाज कल्याण आयुक्त म्हणून बदली करण्यात आळी आहे. तर पीएमपीएमएल अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदी पंकज देवरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

अधिकारी आणि त्यांच्या बदलीचे ठिकाण

नीलेश गटणे

पूर्वीचे पद – मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे

नवीन पद – व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, मुंबई

ज्ञानेश्वर खिलारी

पूर्वीचे पद – संचालक, OBC बहुजन कल्याण, पुणे

नवीन पद – अतिरिक्त सेटलमेंट आयुक्त व अतिरिक्त संचालक, भूमी अभिलेख, पुणे

सतीशकुमार खडके

पूर्वीचे पद – संचालक (आपत्ती व्यवस्थापन), महसूल व वन विभाग

नवीन पद – मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे

भालचंद्र चव्हाण

पूर्वीचे पद – आयुक्त, भू-सर्वेक्षण विकास संस्था, पुणे

नवीन पद – संचालक (आपत्ती व्यवस्थापन), महसूल व वन विभाग, मंत्रालय

सिद्धार्थ शुक्ला

पूर्वीचे पद – सहाय्यक जिल्हाधिकारी, चंद्रपूर

नवीन पद – प्रकल्प अधिकारी ITDP, धारणी व सहाय्यक जिल्हाधिकारी, धारणी उपविभाग, अमरावती

अन्य महत्त्वाच्या नियुक्त्या

विजयसिंह देशमुख – अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, मुंबई येथे व्यवस्थापकीय संचालक

विजय भाकरे – सदस्य सचिव, विदर्भ वैधानिक विकास मंडळ, नागपूर

त्रिगुण कुलकर्णी – उपमहासंचालक, यशदा, पुणे

महेश पाटील – आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे

मंजिरी मानोलकर – व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ

राजलक्ष्मी शाह – व्यवस्थापकीय संचालक, MAVIM, मुंबई

सोनाली मुळे – संचालक, OBC बहुजन कल्याण, पुणे

गजेंद्र बावणे – आयुक्त, भू-सर्वेक्षण विकास संस्था, पुणे

प्रतिभा इंगळे – आयुक्त, अल्पसंख्याक विकास, छत्रपती संभाजीनगर

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT