ED Sarkarnama
प्रशासन

ED action on IAS : बड्या IAS अधिकाऱ्याचा 'गेम' ओव्हर! 1500 कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी ईडीचा दणका; नेमकं प्रकरण काय?

Former collector Rajendra Patel arrested by ED : गुजरातमधील १५०० कोटींच्या भ्रष्टाचार प्रकरणात ईडीचा मोठा दणका; माजी कलेक्टर राजेंद्र कुमार पटेल यांना अटक, चौकशीला वेग.

Rashmi Mane

'ईडी'ने केलेल्या कारवाईमुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. गुजरातमधील सुरेंद्रनगरचे माजी जिल्हाधिकारी आणि 2015 बॅचचे आयएएस अधिकारी डॉ. राजेंद्रकुमार पटेल यांना लाचलुचपत आणि मनी लॉन्डरिंग प्रकरणात अटक करण्यात आली आहे. अहमदाबादचे रहिवासी असलेले राजेंद्र पटेल हे सुरेंद्रनगरचे कलेक्टर असताना त्यांच्या कामकाजावर संशयाची छाया पडली होती. ईडीने छापा टाकल्यानंतर सरकारने त्यांना कलेक्टर पदावरून हटवले होते आणि त्यानंतर राज्याच्या भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागानेही स्वतंत्र गुन्हा दाखल केला होता.

ईडीच्या तपासात मोठ्या प्रमाणावर कागदपत्रे, डिजिटल पुरावे आणि व्यवहारांचे तपशील हाती लागल्यानंतर अखेर पटेल यांना अटक करण्यात आली. प्राथमिक अंदाजानुसार हे संपूर्ण प्रकरण सुमारे 1500 कोटी रुपयांच्या जमीन घोटाळ्याशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही कारवाई होण्याची शक्यता तपास यंत्रणेकडून व्यक्त करण्यात येत आहे. या अटकेमुळे आयएएस अधिकाऱ्यांमधील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

नेमकं प्रकरण काय?

तपासात असे समोर आले आहे की, सीएलयू मंजुरी जलद मिळवून देण्यासाठी प्रति चौरस मीटर लाचेचे दर ठरवले जात होते. या व्यवहारांचे हिशेब हस्तलिखित कागदांवर तसेच डिजिटल फाइल्समध्ये ठेवले जात होते. 23 डिसेंबर रोजी मोरी यांच्या घरावर छापा टाकला असता पलंगाखाली लपवून ठेवलेली 67.50 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. चौकशीत ही रक्कम लाचेची असल्याची कबुली मोरी यांनी दिली.

मोरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मिळालेल्या लाचेपैकी 50 टक्के हिस्सा जिल्हाधिकाऱ्यांकडे जात होता, तर उर्वरित रक्कम इतर वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये वाटली जात होती. या प्रकरणात कलेक्टरचे वैयक्तिक सहाय्यक खात्यांची जबाबदारी सांभाळत असल्याचेही उघड झाले आहे. तपासादरम्यान मोबाईल फोन, व्हॉट्सॲप चॅट, पीडीएफ फाइल्स, छायाचित्रे आणि स्प्रेडशीट्स जप्त करण्यात आल्या असून, त्यातून घोटाळ्याची संपूर्ण साखळी स्पष्ट झाली आहे.

ईडीच्या तक्रारीनंतर गुजरात अँटी करप्शन ब्युरोनेही या प्रकरणात आयएएस अधिकारी राजेंद्र पटेल, चंद्रसिंह मोरी आणि इतर संबंधितांवर एफआयआर दाखल केला आहे. या कारवाईमुळे राज्यातील प्रशासकीय व्यवस्थेतील भ्रष्टाचारावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT