Sanjay Raut : 'माघार घेण्यासाठी उमेदवारांच्या घरी पाच-पाच कोटींच्या बॅगा पोहोचवल्या, निवडणूक अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या स्पष्ट सूचना होत्या की...'

Sanjay Raut Slams Unopposed Elections : 'महाराष्ट्रात साम, दाम दंड भेद वापरून उमेदवार बिनविरोध निवडून आणण्यासाठी नवा ट्रेंड सुरू असून देशाच्या नव्हे तर जगाच्या इतिहासामध्ये इतके बिनविरोध लोक कधी निवडून आले नव्हते. पण जबरदस्तीने विरोधी उमेदवारांना मागार घ्यायला लावायची, त्यासाठी पैशांचा पाऊस पाडायचा.'
 Sanjay Raut
Shiv Sena (UBT) MP Sanjay Raut addresses the media, alleging misuse of money and power in unopposed municipal elections across Maharashtra ahead of civic polls.Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 03 Jan : राज्यातील 29 महापालिका निवडणुकींसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे. मात्र, मतदानाआधीच राज्यभरात जवळपास 67 उमेदवारांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली आहे. या बिनविरोध निवडीवरून विरोधकांनी आक्षेप घेतला आहे.

अशातच आता ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बिनविरोध निवडीवरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले, या देशात मोठ्या मोठ्या नेत्यांना बिनविरोध निवडून दिलेलं नाही. अटल बिहारी वाजपेयी, बॅरिस्टर नाथ पै, वसंतदादा पाटील इतकंच काय नरेंद्र मोदी देखी बिनविरोध निवडून आलेले नाहीत.

पण सध्या महाराष्ट्रात साम, दाम दंड भेद वापरून उमेदवार बिनविरोध निवडून आणण्यासाठी नवा ट्रेंड सुरू असून देशाच्या नव्हे तर जगाच्या इतिहासामध्ये इतके बिनविरोध लोक कधी निवडून आले नव्हते. पण जबरदस्तीने विरोधी उमेदवारांना मागार घ्यायला लावायची, त्यासाठी निवडणूक यंत्रणाच नव्हे तर उमेदवारांवर पैशांचा पाऊस पाडायचा. पाच दहा कोटी उमेदवारांना माघार घेण्यासाठी दिले जात आहेत, असा गंभीर आरोप राऊतांनी केला.

तर यावेळी त्यांनी कल्याणमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर प्रमुख मनोज घरत यांना माघार घेण्यासाठी दिलेला आकडा डोळे फिरतील एवढा मोठा आहे. जळगावमध्ये उमेदवाराने माघार घ्यावी यासाठी त्यांच्या घरी पाच पाच कोटीच्या बॅगा घरपोहोच झाल्यात, असा आरोप करत प्रचंड पैशाचा खेळ या लोकशाहीमध्ये कधीच झाला नव्हता, असंही राऊत म्हणाले.

 Sanjay Raut
Election Commission : ...तर बिनविरोध उमेदवारांची निवड रद्द होणार; निवडणूक आयोगाच्या 'त्या' आदेशामुळे भावी नगरसेवकांचं टेन्शन वाढलं!

तसंच निवडणूक यंत्रणेला तीन वाजेपर्यंत माघारीची वेळ होती पण त्यानंतरही माघारीसाठी कोणी अर्ज घेऊन आले तर ते स्वीकारा आणि तीन वाजल्याच्या आधीची वेळ काढून टाका अशा स्पष्ट सूचना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून देण्यात आल्या होत्या. या सगळ्यांचे फोन कॉल चेक करा, मग बिनविरोध माघारीच रहस्य तुम्हाला कळेल, असं म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर संशय व्यक्त केला.

 Sanjay Raut
Pune Politics : 'त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला...'; गुन्हेगारांच्या उमेदवारीवरून मुरलीधर मोहळांनी डिवचलं, अजितदादांनी थेट मुद्द्यालाच हात घातला

शिवाय या घटनांमुळे महाराष्ट्राची प्रतिष्ठा धुळीस मिळाली असून 60-60 लोक बिनविरोध होत असतील, तर ही निवडणूक आहे का? मग मतदारांनी काय करायचं? जर हे विकले गेले असतील किंवा दबावाने मागे घेत असतील तर त्या भागातील मतदारांनी काय करायचं? असा प्रश्न निवडणूक आयोगाला कधी पडलाय का? आयोग या भ्रष्टाचाऱ्यांच्या ताटाखालचं मांजर झालंय, असं म्हणत राऊतांनी सत्ताधाऱ्यांसह निवडणूक आयोगावरही टीका केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com