IAS.jpg Sarkarnama
प्रशासन

IAS Officers Transfer: महायुती सरकारचा बदल्यांचा धडाका कायम; आता 'या' सात आयएएस अधिकाऱ्यांच्या 'ट्रान्सफर'

Deepak Kulkarni

Pune News: आगामी विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. याचदरम्यान,राज्यातील शिंदे- फडणवीस- पवार सरकारकडून मंत्रिमंडळ बैठकीत धडाकेबाज निर्णयांचा धडाका लावला आहे. राज्य सरकारकडून प्रशासकीय सेवेत भाकरी फिरवण्यात येत आहे.

काही दिवसांपूर्वीच शिंदे सरकारने उच्च पदस्थ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. अशातच आता गुरुवारी (ता.29) पुन्हा एकदा 7 आयएएस (IAS) अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत.

राज्यातील बदली करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये सोलापूरच्या जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी मनीषा आव्हाळे, प्रदीपकुमार डांगे,सतीशकुमार खडके, अभिनव गोयल,विनायक महामुनी, सौम्या चांडक,कुलदीप जंगम यांचा समावेश आहे. या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश राज्य सरकारकडन काढण्यात आले आहे.

सोलापूरच्या जिल्हा परिषद मुख्याधिकारी मनीषा आव्हाळे यांची पुण्यातील स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या पुणे स्मार्ट सिटीसारखी मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर पुणे स्मार्ट सिटी (Pune Smart City) प्रोजेक्टमधील ही घडामोड राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.

सौम्या शर्मा चांडक यांची नागपूर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सतीशकुमार खडके यांची बीड जिल्हा परिषदेची मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या मनीषा आव्हाळे यांना पुणे स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी दिली आहे.

विनायक महामुनी यांची नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर कार्यरत असलेल्या कुलदीप जंगम यांच्याकडे सोलापूर जिल्हा परिषदेच्या सीईओ पदाची धुरा सोपवण्यात आली आहे.

हिंगोलीचे जिल्हाधिकारी म्हणून अभिनव गोयल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.प्रदीप कुमार डांगे यांना राज्य सरकारच्या कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता विभागात आयुक्त पदाचा कार्यभार देण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT