Shoumika Mahadik News: ...म्हणून 'गोकुळ'च्या संचालिका शौमिका महाडिकांना वाटतेय भीती!

Gokul Dudh Mahasangh: गोकुळचे पैसे यात विनाकारण अडकून राहतील. व्यवस्थापन, जागा, बांधकाम खरंच सभासद आणि दूध उत्पादक शेतकरी यांच्यावर त्याचा बोजा पडणार आहे.
Shaumika_Mahadik.jpg
Shaumika_Mahadik.jpgSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : गोकुळ दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक (Shaumika Mahadik) यांनी पत्रकार परिषद घेत शुक्रवारी (ता.30) होणाऱ्या ठरावांमधील काही ठरावांना विरोध दर्शवला आहे.

गोकुळमधील सत्ताधारी आपल्याला सभेमध्ये प्रश्न विचारू देत नसल्याचा आरोप करत ही पत्रकार परिषद घेत असल्याचे महाडिक यांनी सांगितले. मला गोकुळ मोठा झालेला बघायचा आहे. संघांचे भले व्हावे यासाठी माझा विरोध आहे. पण संघाच्या काही मुद्द्याला विरोध आहे असल्याची भूमिकाही महाडिकांनी मांडली.

महाडिक पुढे म्हणाल्या, संघात पशुवैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यास माझा विरोध आहे. असे सांगत शौमिका महाडिक यांनी महाविद्यालयाचा हा घाट घातला आहे? हा शोध घेतला पाहिजे. महाविद्यालयासाठी खर्च गोकुळ(Gokul) करणार, मग दुसऱ्याला खासगी करारावर देण्यास काय उपयोग? महाविद्यालय आणि गोकुळ हा विषय वेगळा आहे असेही त्यांनी सांगितले.

गोकुळचे पैसे यात विनाकारण अडकून राहतील. व्यवस्थापन, जागा, बांधकाम खरंच सभासद आणि दूध उत्पादक शेतकरी यांच्यावर त्याचा बोजा पडणार आहे. राज्य सरकारकडे मागणी करावी. पशु वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करावी. हा कोणाचा घाट असेल हे लोकांनी ओळखावे, असेही महाडिक म्हणाल्या.

Shaumika_Mahadik.jpg
Rajkot Fort Statue Collapse : 'एकदा नाही शंभरवेळा डोकं ठेवायला मी तयार' ; शिंदेंनी मागितली माफी!

अ संस्था सभासद दर्जा मिळवण्यासाठी असणारी दररोज किमान 50 लिटर ही अट रद्द करण्यास विरोध आहे. संस्था वाढवल्या पण त्या प्रमाणे दूध संकलन वाढले नाही. ही अट रद्द करून तुम्ही बोगस मतदार तयार करत आहात. ही अट रद्द करून गोकुळ खासगी करण्याकडे वाटचाल अशा अ वर्गातील संस्था एकूण 36 % वाढल्या, पण केवळ 13% दूध संकलन वाढले आहे. सध्या दुध संकलन वाढ़ ही जिल्ह्यातील नव्हे तर कार्यक्षेत्राबाहेरील दूध संकलनात वाढ झाली आहे. तसेच मुंबई येथील गोकुळच्या म्हैस दूध विक्री घटली आहे, असेही महाडिक म्हणाल्या.

मार्केटिंगच्या अधिकाऱ्यांचे हट्ट आणि लाड का?

यापूर्वी गोकुळमधून सेवानिवृत्त झालेल्या जगदीश पाटील या अधिकाऱ्यांलां पुन्हा एकदा गोकुळने पदावर बसवले आहे. इतकेच नव्हे तर दरमहा अडीच लाख पगार देण्यात येतो. पण या अधिकाऱ्यांना घेण्यास कोणी घाट घातला. शिवाय इतका पगार देऊन मार्केटिंग करण्यास त्याचे योगदान काय? असा सवाल शौमिका महाडिक यांनी केला.

Shaumika_Mahadik.jpg
Manoj Jarange: विधानसभेच्या तोंडावरच जरांगेंनी टाकला मोठा डाव; शिंदे- फडणवीस- अजितदादांची डोकेदुखी वाढणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com