Shivsena UBT News : ठाकरेंच्या आमदाराच्या अडचणीत वाढ; निवडणूक जिंकली पण..

Political News : मुंबई उच्च न्यायालयात आमदार अभ्यंकर यांच्या निवडीला आव्हान देण्यात आले आहे. शिक्षक भरतीचे सुभाष किसन मोरे यांनी याप्रकरणी याचिका दाखल केली आहे.
J. M. Abhynkar
J. M. Abhynkar Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मुंबई शिक्षक मतदारसंघातून निवडून आलेले उध्दव ठाकरे गटाचे आमदार ज. मो. अभ्यंकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अभ्यंकर यांच्या निवडीला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. शिक्षक भरतीचे सुभाष किसन मोरे यांनी याप्रकरणी याचिका दाखल केली आहे.

शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाचे अभ्यंकर यांनी अपात्र मतदारांची नोंदणी करून विजय मिळवल्याचा दावा मोरे यांनी या याचिकेत केला आहे. त्यांची निवड रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे. ज. मो. अभ्यंकर ( J. M. Abhyankar) यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून विविध विनाअनुदानित, स्वयंअर्थसाहाय्यित शैक्षणिक संस्थांमधील प्राथमिक शिक्षक आणि काही शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नोंदणी केल्याचा याचिकेत मोरे यांनी आरोप केला आहे. त्यामुळे सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे.

शिक्षक मतदारसंघात मतदार म्हणून नोंदणी करण्याचा अधिकार केवळ माध्यमिक आणि त्यावरील वर्गांना शिकवणारे शिक्षक यांना आहे. प्राथमिक, पूर्व प्राथमिक (प्ले ग्रुप, नर्सरी, बालवाडी इत्यादी) शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना नोंदणी करता येत नसल्याचा याचिकेत दावा करण्यात आला आहे.

त्यासोबतच 22 वर्षापेक्षा कमी वय असणाऱ्या मतदारांची नोंदणी झाल्याचा याचिकेत आरोप करण्यात आला आहे. अभ्यंकर यांनी बोगस मतदारांची नोंदणी करून निवडणुकीत विजय मिळवल्याचा आरोप मोरे यांनी याचिकेद्वारे केला आहे.

J. M. Abhynkar
Ajit Pawar News : अजितदादांच्या जवळच्या नेत्याचा महायुतीला घरचा आहेर; म्हणाले, 'छत्रपतींसाठी शेकडो सरकारं..'

दरम्यान, मुंबई शिक्षक मतदारसंघातून नुकत्याच झालेल्या निवडणुकीत अभ्यंकर हे विजयी झाले होते. या निवडणुकीत एकूण 12 हजार मतदारांनी मतदान केले होते. त्यापैकी 11 हजार 598 मते वैध ठरली तर 402 मते अवैध ठरली. जिंकून येण्यासाठी 5 हजार 800 इतक्या मतांचा निश्चित कोटा ठेवण्यात आला होता. बाराव्या फेरी अखेर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर हे सर्वाधिक पसंतीक्रमाची 4 हजार 83 मते मिळवून मुंबई शिक्षक मतदार संघातून निवडून आले होते.

J. M. Abhynkar
Gondiya Assembly Election : गोंदिया जिल्ह्यात विधानसभेसाठी चुरस; मविआ अन् महायुतीची प्रतिष्ठा पणाला...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com