IAS Vinay Kumar Choubey, Hemant Soren Sarkarnama
प्रशासन

Vinay Kumar Choubey News : IAS अधिकाऱ्याचा तडकाफडकी राजीनामा;  सोरेन यांच्या अटकेनंतर प्रशासनातही खळबळ

IAS Vinay Kumar Choubey : विनय कुमार चौबे यांनी सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. ते मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव होते. तसेच इतर काही पदांचा अतिरिक्त कार्यभारही होता.

Rajanand More

Jharkhand News : ईडीने हेमंत सोरेन यांना अटक केल्यानंतर मोठा राजकीय भूकंप झाला आहे. मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर लगेच सोरेन यांना ताब्यात घेण्यात आले होते. अटकेला जवळपास 20 तास उलटले तरी राज्यात नवे सरकार अस्तित्वात आलेले नाही. पण त्याआधीच सोरेन यांच्या अटकेचे पडसाद प्रशासनातही उमटू लागल्याने खळबळ उडाली आहे. (IAS Vinay Kumar Choubey)

हेमंत सोरेन (Hemant Soren) यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आयएएस अधिकारी विजय कुमार चौबे यांनीही सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. ते झारखंडमधील (Jharkhand) वरिष्ठ अधिकारी आहे. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव म्हणून ते कार्यरत होते. चौबे यांनी याबाबत एका पत्राद्वारे सर्व पदांचा राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे.

‘पीटीआय’शी बोलताना चौबे म्हणाले, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव म्हणून माझ्याकडे पदभार होता. आता जर मुख्यमंत्र्यांनीच राजीनामा दिल्याने मीही माझ्याकडील पद सोडले आहे. त्याचप्रमाणे माझ्याकडे अतिरिक्त कार्यभार असलेल्या पदांचाही राजीनामा दिला आहे. आता मी नवीन पदावर नियुक्तीसाठी वेटिंगवर असल्याचे चौबे यांनी स्पष्ट केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

चौबे यांनी राजीनामा देण्याआधी गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदावरून आयएएस अधिकारी अविनाश कुमार यांना बुधवारीच पदावरून हटवण्यात आले होते. मुख्य सचिव एल. खैगंटे यांच्याकडे गृह, कारागृह आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचा पदभार दिला जाऊ शकतो.

दरम्यान, चंपई सोरेन (Champai Soren) हे झारखंडचे नवे मुख्यमंत्री बनू शकतात. हेमंत सोरेन यांना अटक झाल्यानंतर झारखंड मुक्ती मोर्चाच्या आमदारांनी चंपई सोरेन यांची विधिमंडळातील गटनेता म्हणून निवड करण्यात आली आहे. राज्यपालांची आज ते भेट घेण्याची शक्यता आहे. त्यानंतर शपथविधीबाबत निर्णय होऊ शकतो.

हेमंत सोरेन न्यायालयीन कोठडीत

ईडीने बुधवारी रात्री हेमंत सोरेन यांना अटक केल्यानंतर आज दुपारी कोर्टात हजर केले. ईडीने दहा दिवसांच्या कोठडीची मागणी कोर्टात केली आहे. न्यायालयाने यावरचा निकाल राखून ठेवत सोरेन यांना एक दिवसाच्या न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. उद्या ईडी कोठडीवर निर्णय दिला जाणार आहे. त्याचप्रमाणे सोरेन यांनी ईडीने केलेल्या अटकेविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. त्यावरही शुक्रवारीच सुनावणी होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT