IB recruitment 2025 Sarkarnama
प्रशासन

IB recruitment 2025 : दहावी पास तरुणांसाठी इंटेलिजेंस ब्युरोमध्ये नोकरीचा 'गोल्डन चान्स'! 365 पदांसाठी बंपर भरती! अर्ज कुठे कराल?

Intelligence Bureau Recruitment : दहावी पास तरुणांसाठी इंटेलिजेंस ब्युरोमध्ये 365 पदांची बंपर भरती जाहीर. पात्रता, पदांची माहिती आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या.

Rashmi Mane

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. आता देशाच्या सुरक्षिततेसाठी काम करणाऱ्या इंटेलिजेंस ब्युरोमध्ये नोकरी करण्याची एक सुवर्णसंधी तुमच्याकडे चालून आली आहे. इंटेलिजेंस ब्युरोने सध्या मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) या पदांसाठी भरतीची अधिसूचना जाहीर केली आहे.

या भरती अंतर्गत देशभरात एकूण 365 पदांसाठी उमेदवार निवडले जाणार आहेत. त्यामुळे दहावी पास झालेल्या आणि सरकारी नोकरीची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी हा एक मोठा 'गोल्डन चान्स' आहे.

अर्ज प्रक्रिया कधी सुरू होणार?

इंटेलिजेंस ब्युरोमधील या नोकरीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 22 नोव्हेंबर 2025 पासून सुरू होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 डिसेंबर 2025 आहे. यामुळे इच्छुकांना अर्ज भरण्यासाठी सुमारे 20 दिवसांचा कालावधी मिळत आहे. नोकरीसाठी उत्सुक असलेल्या उमेदवारांनी शेवटच्या क्षणाची वाट न पाहता लवकरात लवकर अर्ज करणे आवश्यक आहे.

पदांचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता

आयबीने जाहीर केलेल्या या भरतीमध्ये एकूण 365 पदांचा समावेश आहे. ही पदे खालीलप्रमाणे

सिक्युरिटी असिस्टंट/एक्झिक्युटिव्ह : 315 पदे

मल्टी-टास्किंग स्टाफ : 50 पदे

या दोन्ही पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी (10th) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, उमेदवाराकडे अर्ज केलेल्या राज्याचा 'डोमेसाईल सर्टिफिकेट' (Domicile Certificate) असणे गरजेचे आहे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.

अर्ज शुल्क किती?

या भरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांना खालीलप्रमाणे शुल्क भरावे लागेल:

  • सामान्य प्रवर्गातील उमेदवार: 550/-

  • राखीव प्रवर्गातील उमेदवार: 100/-

अर्ज कसा करायचा?

अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाइन असणार आहे. तुम्ही खालील सोप्या टप्प्यांमध्ये तुमचा अर्ज भरू शकता:

  • 1. सर्वात आधी गृहमंत्रालयाच्या (Ministry of Home Affairs) अधिकृत वेबसाइटवर mha.gov.in येथे जा.

  • 2. वेबसाइटवर 'इंटेलिजेंस ब्युरो भरती' (IB Recruitment) संबंधित लिंक शोधा आणि त्यावर क्लिक करा.

  • 3. पहिल्यांदा, तुम्हाला तुमचे रजिस्ट्रेशन (नोंदणी) पूर्ण करावी लागेल.

  • 4. रजिस्ट्रेशन झाल्यावर मिळालेल्या क्रेडेंशियल्ससह वेबसाइटवर लॉग इन करा.

  • 5. लॉग इन केल्यानंतर, विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरून अर्ज पूर्ण करा.

  • 6. अर्ज सबमिट करण्यापूर्वी, त्याची एक प्रिंट आउट काढून भविष्यातील संदर्भासाठी जपून ठेवा.

SCROLL FOR NEXT