Major IPS reshuffle in Maharashtra with new Superintendents of Police appointed in Satara, Sangli, Kolhapur and Jalgaon districts. Sarkarnama
प्रशासन

IPS Transfer News : एकाचवेळी 9 IPS अधिकाऱ्याच्या बदल्या : सातारा, सांगली, कोल्हापूर, जळगावला नवे पोलीस अधीक्षक

IPS Transfer News : महाराष्ट्रात 9 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. सातारा, सांगली, कोल्हापूर आणि जळगाव जिल्ह्यांना नवे पोलीस अधीक्षक मिळाले आहेत

Hrishikesh Nalagune

IPS Transfer News : राज्य सरकारच्या गृह विभागाने सोमवारी (ता. २०) भारतीय पोलिस सेवेतील (आयपीएस) नऊ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. सातारचे वादग्रस्त पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांचेही बदली आदेश आहेत. दोशी यांची सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली आहे. पुण्याचे पोलीस उपायुक्त निखील पिंगळे हे सातारचे नवे पोलीस अधीक्षक असणार आहेत. पुण्याचे दुसरे पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांची वाशीम जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

याशिवाय कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेश गुप्ता यांची पोलीस उपमहानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र येथे बदली झाली आहे. त्यांच्या जागी गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांची बदली झाली आहे. धुळ्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांची जळगावचे पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली आहे. तर जळगावचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांची पुणे येथे राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे.

बदली झालेल्या अधिकाऱ्यांची नावे :

१. निखिल पिंगळे : पोलीस उपायुक्त, पुणे ते पोलीस अधीक्षक, सातारा.

२. राजकुमार शिंदे : पोलीस उपायुक्त, पुणे ते पोलीस अधीक्षक, वाशीम.

३. महेश्वर रेड्डी : पोलीस अधीक्षक, जळगाव ते पोलीस अधीक्षक, सीआयडी पुणे.

४. तुषार दोशी : पोलीस अधीक्षक, सातारा ते पोलीस अधीक्षक, सांगली.

५. संदीप घुगे : पोलीस अधीक्षक, सांगली ते पोलीस उपायुक्त (सुरक्षा), राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई.

६. योगेश गुप्ता : पोलीस अधीक्षक, कोल्हापूर ते पोलीस उपमहानिरीक्षक, गडचिरोली परिक्षेत्र.

७. नीलोत्पल : पोलीस अधीक्षक, गडचिरोली ते पोलीस अधीक्षक, कोल्हापूर.

८. एम. रमेश : अतिरिक्त पोलीस अधीक्षक, गडचिरोली ते पोलीस अधीक्षक, गडचिरोली.

९. श्रीकांत धिवरे : पोलीस अधीक्षक, धुळे ते पोलीस अधीक्षक, जळगाव.

सातारा जिल्हा परिषद (Satara Zilla Parishad) अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीत पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई आणि संदीप मांडवे यांना मतदानाला आले असताना सभागृहाच्या बाहेर अटक केली हेाती. त्यावेळी झालेल्या राड्यात पालकमंत्री शंभूराज देसाई यांना धक्काबुक्की करण्यात आली होती. त्याचे तीव्र पडसाद राज्यात उमटले होते. त्यामुळे तुषार दोशी यांच्या बदलीची मागणी करण्यात येत होती.

तुषार दोशी यांची यापूर्वीही जालना जिल्ह्यातूनही वादामुळेच बदली करण्यात आली होती. मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान, मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर लाठीचार्ज करत मारहाण केल्याचा त्यांचावर आरोप झाला होता. यावेळी गोळीबार झाल्याचाही दावा जरांगे पाटील यांनी केला होता. त्यानंतर त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते. तिथून त्यांची पुण्याला बदली झाली होती. पुण्यातून सातारा आणि आता सांगलीला बदली झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT