

Maharashtra IAS Transfers: महाराष्ट्र पुन्हा एकदा ५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. गेल्या काही दिवसांत तीन वेळा IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यामुळं महाराष्ट्रात प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सरकारकडून लावण्यात आल्याचं चित्र आहे. आता पुन्हा नव्यानं झालेल्या बदल्यांमध्ये पुणे, मुंबई, सोलापूर, गडचिरोली आणि धाराशिव इथं नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
आएएस डॉ. बी. एन. पाटील, आएएस मंगेश जोशी, आएएस कुलदीप जंगम, आएएस कुशल जैन, आएएस रेवैय्या डोंगरे या पाच भारतीय प्रशासकीय सेवा अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये डॉ. पाटील यांच्याकडं सध्या पर्यटन संचालकपदाची जबाबदारी होती त्यांची बदली आता उच्च व तंत्र शिक्षण विभागातील रुपा प्रकल्पाचे संचालक म्हणून करण्यात आली आहे.
IAS कुलदीप जंगम हे सध्या सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असून त्यांची बदली आता पिंपरी-चिंचवड महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून करण्यात आली आहे. तसंच धाराशिवच्या भूममध्ये सहाय्यक जिल्हाधिकारी असलेले IAS रेवैय्या डोंगरे यांची बदली यवतमाळच्या पांढरकवडा इथल्या आयटीडीपी प्रकल्प अधिकारी तसंच केळापूरच्या सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
त्याचबरोबर गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी इथं आयटीडीपी प्रकल्प अधिकारी तसंच सहाय्यक जिल्हाधिकारी असलेल्या IAS अधिकारी कुशल जैन यांची बदली सोलापूर जिल्हा परिषदेच्या सीईओपदी करण्यात आली आहे. तर पुण्यातील यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी अर्थात यशदाच्या उपमहानिदेशकपदावर कार्यरत असलेले IAS अधिकारी मंगेश जोशी यांची पर्यटन संचालक म्हणून मुंबई बदली करण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.