Jalgaon Anti Corruption Bureau investigation Sarkarnama
प्रशासन

Anti Corruption Bureau : जालन्यात व्यापाऱ्याकडून साठ हजारांची लाच घेताना महिला जीएसटी अधिकारी, कर सल्लागाराला रंगेहाथ पकडले!

Jalna GST officer caught accepting bribe news : कदीम जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईनंतर संपूर्ण प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी प्रशासकीय पातळीवर कठोर पावले उचलली जात असली तरी लाचखोरीचे प्रकार थांबत नाहीयेत.

Jagdish Pansare

Jalna News : इनपुट टॅक्स क्रेडिटचा लाभ मंजूर करून देण्यासाठी 60 हजार रुपयांची लाच स्वीकारताना राज्य सहआयुक्त वस्तू व सेवा कर कार्यालयाच्या राज्यकर अधिकारी सुवर्णा रामेश्वर लोहिया यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. दरम्यान या प्रकरणी कर सल्लागार अक्षय लोढा यालाही अटक करण्यात आली आहे.

जालना शहरातील तक्रारदाराचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे दुकान आहे. त्यांनी इनपुट टॅक्स क्रेडिटसाठी अर्ज केला होता. या प्रकरणात राज्यकर अधिकारी सुवर्णा रामेश्वर लोहिया (वय 44) यांनी अर्ज मंजूर करण्यासाठी एक लाखांची लाच मागितल्याचे टॅक्सचे काम करणारे अक्षय लोढा यांनी तक्रारदार यांना सांगितले. त्यामुळे तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार केला.

या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर सेवाकर अधिकारी सुवर्णा लोहिया यांनी मंगळवारी (ता. 28) त्यांच्या कार्यालयाच्या दालनामध्ये 60 हजारांच्या लाचेची रक्कम पंचा समक्ष स्विकारली. त्यानंतर एसीबीने सेवाकर अधिकारी सुवर्णा लोहिया, कर सल्लागार अक्षय लोढा या दोघांना अटक केले आहे. या प्रकरणी कदीम जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईनंतर संपूर्ण प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी प्रशासकीय पातळीवर कठोर पावले उचलली जात असली तरी लाचखोरीचे प्रकार थांबत नाहीयेत.

शासकीय काम कायदेशीररीत्या व विनामूल्य पूर्ण करून देण्याऐवजी महिला अधिकारी सुवर्णा लोहिया यांनी खासगी सल्लागार अक्षय लोढा याच्या माध्यमातून व्यापाऱ्याकडे तब्बल एक लाख रूपयांच्या लाचेची मागणी केली. संबंधित व्यापाऱ्याला कोणत्याही प्रकारची लाच देण्याची मुळीच इच्छा नव्हती. त्यामुळे त्याने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गाठून या गैरप्रकाराची रीतसर तक्रार केली.

या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत अधिकार्‍यांनी गोपनीय पद्धतीने पडताळणी सुरू केली. दरम्यान, लाचखोर अधिकारी आणि व्यापारी यांच्यात रकमेवरून तडजोड झाली आणि अंतिम 60 हजार रुपये देण्याचे निश्चित झाले. सर्व कायदेशीर प्रक्रिया आणि सापळ्याची पूर्वतयारी पूर्ण झाल्यानंतर, कार्यालयाच्या आवारातच ठरलेली रक्कम स्वीकारताना एसीबीच्या पथकाने दोन्ही आरोपींना अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले.

या कारवाईनंतर कदीम जालना पोलीस ठाणे येथे दोन्ही आरोपींविरोधात रीतसर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पार पडली आहे. सध्या या दोघांनाही अटक करण्यात आली असून, पोलीस आणि एसीबीचे पथक या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT