प्रशासन

Job Opportunity in Department of Public Health : सार्वजनिक आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकाऱ्यांची मेगा भरती; 1729 पदे भरली जाणार

Job Opportunity : या भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती जाणून घेऊयात..

Anand Surwase

Job Opportunity: वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागात काम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने तब्बल 1729 वैद्यकीय अधिकारी पदांची भरती जाहीर केली आहे. या भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती जाणून घेऊयात..

राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने गट अ अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदाच्या रिक्त जागांसाठी भरती काढण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत. एकूण 1729 पदाच्या या भरतीमध्ये MBBS आणि स्पेशालिस्ट वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे भरली जाणार आहेत. यासाठी उमेदवार हा MBBS किंवा समतुल्य पदवी प्राप्त असावा. तसेच स्पेशालिस्ट(बाल रोग, कान-नाक-घसा, स्त्रीरोग, भूलतज्ञ इ..) पदासाठी उमेदवाराचे वैद्यकीय क्षेत्रातील निगडीत पदव्युत्तर पदवी किवा डिप्लोमा पूर्ण झालेला असावा.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या भरतीसाठी उमेदवाराचे वय हे 31 जानेवारी 2024 रोजी 18 ते 38 वर्षे असावे. या भरतीसाठी सरकारी नियमानुसार मागासवर्गीय/अनाथ उमेदवारांना जास्तीत जास्त 05 वर्षे अधिक वयाची सूट देण्यात आली आहे. तर इतर मागासवर्गीय उमेदवारांना जास्तीत जास्त 3 वर्षे अधिकच्या वयाची सूट देण्यात आली आहे. या भरतीसंदर्भातील सविस्तर माहिती http://arogya.maharashtra.gov.in‍ या‍ संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या भरतीसाठी पात्र उमेदवारानी https://www.morecruitment.maha-arogya.com या संकेतस्थळावर आपला अर्ज सादर करायचा आहे. अर्जासोबत उमेदवाराने आधार कार्ड, जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, गुणपत्रिका, राखीव पदासाठी अर्ज करत असल्यास जात प्रवर्ग प्रमाणपत्राच्या साक्षांकीत प्रती अपलोड करणे अनिवार्य आहे. या भरतीसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकडून 1000/- रुपये तर मागासवर्गीय उमेदवारांकडून 700/ रुपये शुल्क आकारले जाणार आहे. हे शुल्क उमेदवारांनी ऑनलाईन भरणा करायचे आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत आहे.

या भरतीची निवड प्रक्रिया ही एमबीबीएस, बीएएमएस च्या सरासरी गुणवत्तेनुसार गुणवत्ता यादी लावली जाणार आहे. या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आरोग्य विगाने प्रसिद्ध केलेली भरतीची सविस्तर जाहिरात पाहावी. जाहिरात लिंक -https://drive.google.com/file/d/1ulISvsmvtl9D1yRanVyErYX63K_9FhHE

Rashmi Mane

SCROLL FOR NEXT